नेत्यांच्या कोलांटउड्यांनी कार्यकर्त्यांची गोची

By Admin | Updated: September 29, 2014 23:07 IST2014-09-29T23:07:43+5:302014-09-29T23:07:43+5:30

विधानसभा निवडणुकीला आता खरा रंग चढत आहे. निवडणूक जसजशी जोमात येत आहे तसतशा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. इकडचे कार्यकर्ते तिकडे आणि तिकडचे इकडे खेचून प्रमुख पक्षांकडून आपली

Leaders of Colatanti party workers | नेत्यांच्या कोलांटउड्यांनी कार्यकर्त्यांची गोची

नेत्यांच्या कोलांटउड्यांनी कार्यकर्त्यांची गोची

गोंदिया : विधानसभा निवडणुकीला आता खरा रंग चढत आहे. निवडणूक जसजशी जोमात येत आहे तसतशा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. इकडचे कार्यकर्ते तिकडे आणि तिकडचे इकडे खेचून प्रमुख पक्षांकडून आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यात ज्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता जास्त, त्यांच्याकडे जाण्यास अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे अनेक वर्षे ज्या पक्षाचा झेंडा घेऊन मिरवलो त्या पक्षाने तिकीट नाकारल्याने ऐन वेळी दुसऱ्या पक्षाच्या तिकीटवर मैदानात उतरलेल्या नेत्यांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. नवीन पक्षात काम करण्याची मानसिकता बनविणे त्यांच्यासाठी कठीण होत आहे. प्रत्यक्ष मतदानाला आता अवघे १५ दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांची धडधड वाढू लागली आहे. अशात आपले कार्यकर्ते वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्याचे सत्र प्रमुख उमेदवारांकडून सुरू आहे. यात कार्यकर्तेसुद्धा आपल्या ‘भविष्या’चा विचार करून कोणाला साथ देणे जास्त फायदेशीर ठरेल याचा विचार करून भविष्याची दिशा निश्चित करताना दिसत आहे. यातूनच कार्यकर्त्यांची फुटा-फूट सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची यादी बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर निश्चित होईल. रिंगणात अनेक जण राहणार असले तरी प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवारांतच लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या या युद्धात साम, दाम, दंड व भेद या अस्त्रांचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे.
निवडणूक म्हटली की यामध्ये मतदार व कार्यकर्ते या दोन गोष्टी अतिमहत्वाच्या आहेत. यामुळे आता मतदारांचा कल आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवार प्रचार सभा व भेटी-गाठींचे माध्यम अवलंबित आहेत. कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून आपली ताकद वाढविण्यासोबतच इतरांना कमजोर करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षातून होत आहे. मात्र काही ठिकाणी कार्यकर्ते सुरक्षित भविष्याची चाहुल ओळखून स्वत:हून एखाद्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. काही अनुभवी उमेदवार राजकारणात रमलेले आहेत. यामुळे त्यांना हे कसब चांगलेच अवगत आहे. कार्यकर्ते आपल्या खेम्यात आल्यास त्यांची मतं तर मिळणारच, मात्र त्यांचा वापर करून त्यांच्या संपर्कातील अन्य मते सुद्धा खेचता येतील या उद्देशाने कार्यकर्त्यांमध्ये फुटा-फुटीचे राजकारण आता गाजू लागले आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Leaders of Colatanti party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.