पालकमंत्र्यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:01 IST2018-10-28T22:01:17+5:302018-10-28T22:01:31+5:30
ग्राम मोहगाव (तिल्ली) येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
निंबा (तेढा) : ग्राम मोहगाव (तिल्ली) येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्रावर प्रथम धान घेऊन येणाऱ्या महिला शेतकरी कांता सदाराम गौतम यांचे मंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती दिलीप चौधरी, बाजार समिती सभापती योगराज पारधी, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, पं.स. सदस्य ललीता बहेकार, सरपंच अल्का पाथोडे, तालुका शेती उद्योग साधन सामुग्री खरेदी विक्रीचे अध्यक्ष नामदेव भगत, डिगराज कटरे उपसरपंच, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था लोकराम बोपचे, माजी पोलीस पाटील बाबुलाल गौतम, रेवालाल कटरे, नारायण पटले, चुन्नीलाल गौतम, सुरजलाल पटले सर्व शेतकरी व गावकरी उपस्थित होते.