लोकार्पणाआधीच जलावतरण

By Admin | Updated: June 16, 2016 02:13 IST2016-06-16T02:13:33+5:302016-06-16T02:13:33+5:30

जिल्हा क्र ीडा संकुला येथे जलतरण तलावाचे काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच या जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

Before launch, launch | लोकार्पणाआधीच जलावतरण

लोकार्पणाआधीच जलावतरण

गोंदिया : जिल्हा क्र ीडा संकुला येथे जलतरण तलावाचे काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच या जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच युवा वर्ग त्यात बिनधास्तपणे पोहण्याचा आनंद लुटत आहेत. वास्तविक सध्या या तलावाची चाचणी सुरू असल्यामुळे त्यातील केमिकल हाणीकारण ठरू शकतात, असा इशारा जिल्हा क्रीडा कार्यालयाने दिला आहे.
जलतरण तलावात भरलेल्या पाण्याची व फिल्ट्रेशन प्लान्टची चाचणी घेण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेकडून सुरु आहे. त्यामुळे त्यातील पाण्यामध्ये केमिकल्स व अ‍ॅसिड मिसळविण्यात आलेले आहे. ते शरीरास अपायकारकण ठरू शकते. त्यातून त्वचेचे रोग, त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जोपर्यंत जलतरण तलावात भरलेल्या पाण्याची तसेच फिल्ट्रेशन प्लांटची चाचणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणीही जलतरण तलावात प्रवेश करु नये. जलतरण तलावाच्या परिसरात भविष्यात होणाऱ्या कुठल्याही घटनेस जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा क्रीडा संकुल समिती जबाबदार राहणार नाही, असे आवाहन जिल्हा क्रीडा संकुल समीती गोंदियातर्फेकरण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Before launch, launch