फुटबॉल प्रचार-प्रसाराचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 02:29 IST2017-07-12T02:29:49+5:302017-07-12T02:29:49+5:30

जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजीत जिल्हा मिशन-१ मिलियन फुटबॉल प्रचार-प्रसाराचा

Launch of Football Promotion | फुटबॉल प्रचार-प्रसाराचा शुभारंभ

फुटबॉल प्रचार-प्रसाराचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजीत जिल्हा मिशन-१ मिलियन फुटबॉल प्रचार-प्रसाराचा शुभारंभ पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सोमवारी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा क्रीडा अधिकारी शुभाष गांगरेड्डीवार, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे उपस्थित होते. अवघा महाराष्ट्र फुलबॉलमय करण्यास जिल्ह्यात फुटबॉल या खेळाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने हे मिशन उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात सुध्दा चांगले फुटबॉलपटू तयार होण्यास या मिशनची मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बडोले यांनी केले. दरम्यान पालकमंत्री बडोले, जिल्हाधिकारी काळे, पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ यांनी फुटबॉलला किक मारुन या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी क्रिडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उईके, बारसागडे व क्र ीडापटू तसेच क्रि डाप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Launch of Football Promotion