क्वारंटाईन सेंटरमधील जेवणात आढळल्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:13+5:30

बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यासाठी शहरात चार ते पाच ठिकाणी स्थानिक नगर परिषद आणि आरोग्य विभागाने क्वारंटाईन सेंटर स्थापन केले आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या नागरिकांच्या जेवण व नाश्त्याची आणि सेंटरच्या स्वच्छतेची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे. तर आरोग्य विषयक तपासणीची जबाबदारी तालुका आरोग्य विभागाकडे आहे.

Larvae found in meals at the quarantine center | क्वारंटाईन सेंटरमधील जेवणात आढळल्या अळ्या

क्वारंटाईन सेंटरमधील जेवणात आढळल्या अळ्या

Next
ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : प्रशासनाचा अनागोंदी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना शहरातील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. गोंदिया-बालाघाट मार्गावरी जिनियस रिसार्ट येथे काही नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. याच क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना सकाळी दिलेल्या जेवणात अळ्या आढळल्याची घटना मंगळवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांचे आरोग्य कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यासाठी शहरात चार ते पाच ठिकाणी स्थानिक नगर परिषद आणि आरोग्य विभागाने क्वारंटाईन सेंटर स्थापन केले आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या नागरिकांच्या जेवण व नाश्त्याची आणि सेंटरच्या स्वच्छतेची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे. तर आरोग्य विषयक तपासणीची जबाबदारी तालुका आरोग्य विभागाकडे आहे. नगर परिषदेने क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना जेवण आणि नाश्ता देण्यासाठी एका कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. याच कंत्राटदाराच्या माध्यमातून दोन वेळेचे जेवण आणि नाश्ता दिला जातो. मंगळवारी सकाळी ११ वाजता जिनियस रिसार्ट येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना कंत्राटदाराकडून जेवणाचा पुरवठा करण्यात आला. पण काही नागरिकांच्या जेवणात अळ्या आढळल्या तर काहींच्या जेवणात खडे आढळले. त्यामुळे याप्रकरणाने येथील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी या प्रकरणाची तक्रार क्वारंटाईन सेंटर येथे नियुक्त असलेल्या कर्मचाºयाकडे केली. पण त्यांनी सुध्दा ही बाब गांर्भियाने घेतले नाही. त्यामुळे त्यांनी थेट नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांना फोन करुन सर्व प्रकार सांगितला. तसेच असे निकृष्ट आणि अळ्यायुक्त जेवणामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली. मुख्याधिकारी चव्हाण यांनी याची दखल घेत क्वारंटाईन सेंटरला भेट देवून जेवणाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जेवणाचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराला याप्रकाराबद्दल जाब विचारल्याची माहिती आहे. मात्र या प्रकारामुळे क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

क्वारंटाईन सेंटरसंदर्भात यापूर्वीही तक्रारी
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जिनियस रिसार्ट येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा येथेच निकृष्ट जेवण पुरवठ्याचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे या क्वारंटाईन सेंटरमधील सोयी सुविधांमध्ये अद्यापही सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे.

कंत्राटदाराला बजावली नोटीस
जिनियस रिसार्ट येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना गोंदिया येथील हलमारे कॅटर्सकडून जेवणाचा पुरवठा केला जातो. त्यांच्याकडून चांगल्या दर्जाचा जेवणाचा नियमित पुरवठा केला जातो. मात्र मंगळवारी प्रथमच असा प्रकार घडला. याप्रकरणी या कंत्राटदाराला नोटीस बजावली असून यापुढे असा प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यात बजाविण्यात आले असल्याचे न.प.मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Larvae found in meals at the quarantine center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.