ढोकळ्यात आढळल्या अळ्या

By Admin | Updated: February 23, 2015 01:58 IST2015-02-23T01:58:02+5:302015-02-23T01:58:02+5:30

शहराच्या गांधी चौकातील मॉ वैशाली राजपुरोहित या हॉटेलात रविवारी (दि.२२) सकाळी ११ वाजता ढोकळ्यात अळ्या आढळल्या आहेत.

The larvae found in the doses | ढोकळ्यात आढळल्या अळ्या

ढोकळ्यात आढळल्या अळ्या

गोंदिया : शहराच्या गांधी चौकातील मॉ वैशाली राजपुरोहित या हॉटेलात रविवारी (दि.२२) सकाळी ११ वाजता ढोकळ्यात अळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी आक्रोश व्यक्त करीत अन्न व औषध विभागाकडे तक्रार केली आहे.
रविवारी सकाळी ढोकळा तयार करण्यात आला. गोंदियातील शिक्षिका व जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालिका यशोधरा सोनवाने या मॉ वैशाली राजपुरोहीत या हॉटेलात ढोकळा खाण्यासाठी कुटुंबासह गेल्या असता यावेळी त्यांच्या ढोकळ्यात अळ्या आढळल्या. हा प्रकार त्यांनी दुकान मालक मदनसिंह राजपुरोहित यांना दाखविला. यावेळी या दुकानात छोटा गोंदियातील मंगेश बनकर व दुर्गा चौकातील दिनेश शर्मा यांनी हा प्रकार बघितला. अळ्या असलेले ढोकळे विक्री करीत असल्याने त्या दुकानदाराची तक्रार यशोधरा सोनवाने यांनी अन्न व औषध प्रशासनकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
ढोकळ्यात अळ्या नव्हत्या. ढोकळ्यावर टाकलेल्या कोथींबीरमध्ये अळ्या होत्या. आम्ही कोथींबिर धुवून कापून आणले होते मात्र त्यातच अळ्या होत्या.
- मदनसिंह राजपुरोहीत
संचालक, मॉ वैशाली राजपुरोहीत हॉटेल, गोंदिया.

Web Title: The larvae found in the doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.