भूमाफियांकडून होत आहे प्लॉटधारकांची फसवणूक

By Admin | Updated: December 15, 2014 22:58 IST2014-12-15T22:58:06+5:302014-12-15T22:58:06+5:30

आमगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात भूमाफियांची टोळी सक्रिय असून प्लॉटधारकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.

Landlord's fraud is being done by landlords | भूमाफियांकडून होत आहे प्लॉटधारकांची फसवणूक

भूमाफियांकडून होत आहे प्लॉटधारकांची फसवणूक

कालीमाटी : आमगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात भूमाफियांची टोळी सक्रिय असून प्लॉटधारकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.
तालुक्यात कुठेही आपला प्लॉट असेल तर त्या जागेवर बांधकाम करणे गरजेचे झाले आहे. कारण जमिनीचे दलाल सक्रीय असून गावात कुठलाही प्लॉट किंवा जमीन दाखवून त्याची खरेदी-विक्री करण्याचे प्रकार फोफावत आहे.
बनगाव येथे नुकतेच सदर प्रकरण उघडकीस आले आहे. सन १९६९-७० या कालावधीत शेतकरी आपली शेतजमिन विक्री करीत होते. त्यावेळी ५० डिसमिलपेक्षा कमी जमिनीची रजिस्ट्री होत नव्हती. म्हणून खरेदी विक्रीचे व्यवहार एका स्टॉम्पवर लिहून घेतले जात असे, पण फेरफार होत नसत. त्यामुळे सात-बारावर विक्री करणाऱ्या जमीनमालकासह वारसांचे नाव आजही अस्तित्वात आहेत. यामुळे या जमीन किंवा प्लॉटमधून मार्ग कसा काढता येईल याची शक्कल भूमाफिया लढवत आहेत.
वारसांना प्रलोभन देऊन सातबारा नकाशा घेणे आणि तलाठी भूमापन अधिकारी यांना वेठीस घेवून विक्री केलेला प्लॉट परस्पर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला विक्री करण्याचा गोरखधंदा परिसरात जोरात सुरू आहे. कामठा रोड परिसरात भूमाफियांनी एका प्लॉट मालकाला प्लॉट विक्री करण्याकरिता प्रथम दुसऱ्या व्यक्तीचा प्लाट दाखविला.
नंतर त्याचे प्लॉट दाखवून सदर प्लाट विक्रीसाठी आहे, असा ठराव दाखविण्यात आला. त्यामुळे गृहस्थांनी सदर आपल्या मालकीच्या जमिनीचे बांधकाम मध्यरात्रीच करवून घेतले. यामुळे याप्रकरणी रिकाम्या प्लॉटवर भूमाफियांकडून विक्री केली जाणार नाही ना? अशी भिती ग्रामस्थ व प्लाटधारकांना वाटत आहे.
या प्रकरणात अनेक लोक गुंतले आहेत. हे लोक परिसरात अशांतता व अराजकरता पसरवित आहेत. या प्रकरणाची तक्रार भूमापन, तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन आमगाव या ठिकाणी करण्यात आली आहे. सदर प्लॉटचे गट नंबर वेगवेगळे आहे किंवा एकच नंबर आहेत यासंदर्भात चौकशी होणार आहे. या प्रकरणी दोषी भूमाफियांवर कारवाईचा बडगा येणार असल्याची गावात चर्चा आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Landlord's fraud is being done by landlords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.