जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST2021-02-06T04:53:18+5:302021-02-06T04:53:18+5:30
देवेंद्र राऊत यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देवून त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आर.एफ.राऊत, भात संशोधन केंद्र नवेगावबांध यांनी मृद ...

जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रम
देवेंद्र राऊत यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देवून त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आर.एफ.राऊत, भात संशोधन केंद्र नवेगावबांध यांनी मृद तपासणीचे महत्त्व, मृदपत्रिका आधारित खताची मात्रा देण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी बी. एल. पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्यास सांगितले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे उन्नयन योजना, विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत विविध उपक्रम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका, बांधावरील वृक्ष लागवड याची माहिती पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन विलास कोहाडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) यांनी केले. प्रास्ताविक के. एम. बोरकर यांनी तर बी. एम.नखाते यांनी आभार मानले. कार्यक्रमास आर.बी.संग्रामे, के. टी. गायकवाड, व्ही. एच. मेश्राम, एम. ए. मोरे, एफ. एम. कापगते, वाय. बी. मोहतुरे उपस्थित होते.