भरारी पथकाने आकारला घरगुती मीटरवर लाखाचा दंड

By Admin | Updated: November 11, 2014 22:43 IST2014-11-11T22:43:10+5:302014-11-11T22:43:10+5:30

आम्ही जे करतो तेच योग्य अशी भूमिका विद्युत वितरण कपंनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येते. बरबसपुरा येथील मनोहर गोपाल कनोजे यांच्यावर भरारी पथकाने वीज

Lakh's penalty on domestic meter charged by flying squad | भरारी पथकाने आकारला घरगुती मीटरवर लाखाचा दंड

भरारी पथकाने आकारला घरगुती मीटरवर लाखाचा दंड

काचेवानी : आम्ही जे करतो तेच योग्य अशी भूमिका विद्युत वितरण कपंनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येते. बरबसपुरा येथील मनोहर गोपाल कनोजे यांच्यावर भरारी पथकाने वीज चोरीपायी एक लाख आठ हजार रूपये आकारले. रक्कम मंजूर नसल्याने प्रकरण ग्राहक न्यायालयात गेले. तरी तिरोड्याचे उपकार्यकारी अधिकारी व गंगाझरीचे कनिष्ठ अभियंते अमित चवरे रूपये भरण्यासाठी तगादा लावून छळ करीत असल्याचे मनोहर कनोजे यांचा मुलगा मुकेश यांनी लोकमतला सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, सन २०१३ मध्ये विद्युत विभागाच्या भरारी पथकाने घाड घालून मोठ्या प्रमाणात वीज आकारणी केली. ८२ हजार रूपये वीज चोरीचे आणि ३० हजार रूपये नागपूर पोलीस चार्जचे आकारण्यात आले. मात्र ही आकारणी चुकीची असून, ते कमी करून योग्य आकारणीसाठी कनोजे यांनी तिरोड्याचे उपकार्यकारी अधिकारी व संबंधितांकडे मागणी केली.
परंतु अधिकाऱ्यांनी भरणा केले नाही तर अंधारातच रहा, असा पवित्रा घेतला. तसेच कनोज यांचे काहीही न ऐकता विद्युत वितरण कंपनी गड्डीगुदाम व सदर नागपूरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी कलम १३५, १३८ वीज कायदा २००३ अन्वये दाखल करून सीआरपीसी कलम १६० अन्वये नोटीस बजावला.
बिल मंजूर नसून न्यायालयाचा निर्णय आपल्याला मान्य राहील म्हणून कनोजे यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेवून १८ आॅक्टोबर २०१४ रोजी प्रकरण दाखल केले. कनोजे यांनी सांगितले की, बिल भरायला आपला नकार नाही. परंतु बेकायदेशीर आकारणी मान्य नसल्यामुळे आपण न्यायालयात गेलो. आता न्यायालय जे निर्णय देईल त्याचे पालन आपण २४ तासाच्या आत करू, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी आपल्याला तात्पुरते नवीन मीटर मिळावे, यासाठी अर्ज केला होता. परंतु गंगाझरीचे कनिष्ठ अभियंता चवरे हे नाहक त्रास देवून अभद्र व्यवहार करीत असल्याचे कनोजे यांनी सांगितले.
तिरोड्याचे उपकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे गंगाझरी शाखेचे कनिष्ठ अभियंता अमित चवरे मीटर देत नाही. शिवाय आपण घरच्या वस्तू विका आणि सदर रक्कम भरा तेव्हाच मीटर देवू. शिवाय तुम्ही न्यायालयात गेले. त्यामुळे जेव्हा न्यायालय निर्णय देईल, तेव्हाच आम्ही मीटर देवून वीज पुरवठा करू, असे अभियंता चवरे बोलत असल्याचा आरोप कनोजे यांनी केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Lakh's penalty on domestic meter charged by flying squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.