लाखो भाविकांनी दिली कचारगडला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:50 PM2019-02-21T22:50:17+5:302019-02-21T22:51:08+5:30

सतत पाच दिवस चालणाऱ्या कचारगड यात्रेत दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाच दिवसीय यात्रेदरम्यान विविध राज्यातील ६ लाखावर भाविकांनी भेट दिल्याचा अंदाज देवस्थान समितीकडून वर्तविला जात आहे.

Lakhs of devotees visited Kakarhad | लाखो भाविकांनी दिली कचारगडला भेट

लाखो भाविकांनी दिली कचारगडला भेट

Next
ठळक मुद्देदरवर्षीच्या तुलनेत भाविकांच्या संख्येत वाढ : विविध कार्यक्रमांनी यात्रेची सांगता

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सतत पाच दिवस चालणाऱ्या कचारगड यात्रेत दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाच दिवसीय यात्रेदरम्यान विविध राज्यातील ६ लाखावर भाविकांनी भेट दिल्याचा अंदाज देवस्थान समितीकडून वर्तविला जात आहे. पाच दिवस संपूर्ण कचारगड व धनेगाव परिसर जय सेवा जय जय सेवाच्या गजराने दुमदुमला होता.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या प्राचीन गुफेत गोंडी संस्कृतीचे रचनाकार पारी कुपार लिंगो गोंडाचे ३३ कोटी सगापेन आणि १२ पेनचे ७५० गोत्र यांचे उगम स्थळ आहे. कचारगड रामताळ जंगो, संगीत सम्राट हिरासुका पाटालीर, यांची कर्मभूमी असून या कचारगड परिसरात हजारो वर्षांपासून माँ काली कंकाली सल्ला शक्ती यांचा वास आहे. म्हणून या परिसराला आदिवासी समाजामध्ये विशेष महत्त्व असून या स्थळाबद्दल त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेनिमित्त सकल आदिवासी समाज आपल्या पूर्वजाप्रती आस्था व श्रद्धा व्यक्त करण्यासाठी हजारो कि.मी.चा प्रवास करीत देशाच्या कानाकोपºयातून येथे पोहचतात. यासाठी त्यांना होणारा कोणताही त्रास श्रद्धेपेक्षा फार तोकडा पडतो. आदिवासींची श्रद्धा व आस्था, विश्वास पाहता जिल्हा प्रशासन सुध्दा भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देत असते.
पाच दिवसीय कचारगड यात्रेदरम्यान प्रथम दिवशी कोया पुनेमी गड जागरण व कोया पुनेमी यात्रेचा महत्त्व सांगणारे अनेक कार्यक्रम दिवस व रात्रभर घेण्यात येतात. यामध्ये गोंडी भूमकाल, गोंडी धर्माचार्य, गोंडी प्रचारक व गोंडी धर्माचे अनुयायी हजारोंच्या संख्येत सहभागी झाले. गोंडी धर्माचार्यानी गोंडी पूनेमीवर प्रवचन सादर केले. दादा प्रेमसिंह सल्लाम आणि शंकर शहा इरपाची यांचे प्रवचन महत्त्वपूर्ण ठरले. दुसºया दिवशी राजे वासुदेव शाह टेकाम यांच्या हस्ते ध्वजारोहण गोंडी ध्वज फडकावून पालखीची सुरुवात करण्यात आली. या वेळी भूमकाल (पुजारी) यांनी धर्मानुसार नैसर्गिक पूजन विधी पार पाडला.
या शंभुशेकच्या पालखीसह देशभरातील भाविकांनी सहभाग घेतला. पाचवे राष्टÑीय गोंडवाना महाअधिवेशन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे विधीवत उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा दिवस कचारगड यात्रेत महत्त्वपूर्ण ठरला. रात्रीला सांस्कृृृृृतिक महोत्सव पार पडले. यामध्ये गोंडी समाजाचे अनेक मान्यवर सहभागी झाले. यामध्ये गोंडी कलाकारांनी आपल्या पारंपारिक कलेचे सादरीकरण केले.तिसºया दिवशी पौर्णिमे निमित्त कोया पुनेमी महोत्सव व राष्टÑीय गोंगाना महासंमेलन घेण्यात आला.या संमेलनात गोंडी संस्कृतीवर विचार मंथन करण्यात आले. यामध्ये राजमाता फुलवादेवी या दिल्लीवरुन कचारगड येथे दाखल झाल्या होत्या.आपल्या गोंडी सगा सोयºयांना मार्गदर्शन केले. यामध्ये भूमकाल संघाचे रावेण इनवाते, शेरसिंह आचला यांचा सहभाग लाभला. चौथ्या दिवशी राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन घेण्यात आले. महाअधिवेशनात गोंडवाना क्षेत्रातील जल,जंगल जमीन सुरक्षीत ठेवण्यासाठी अनेक प्रस्ताव पारीत करण्यात आले. अनेक बाबींवर विचारांची देवाण घेवाण करण्यात आली. यामध्ये देशातील विविध प्रांतातून आलेल्या इतिहासकार, अभ्यासक, संशोधन यांचा सहभाग लाभला. भविष्यात कचारगड परिसराला कसे सुरक्षित ठेवून त्याचे महत्त्व कायम ठेवले जाईल याबद्दल सखोल चर्चा केली.
पाचव्या दिवशी गोंडवाना साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. साहित्य संमेलनात अनेक राज्यातील जेष्ठ साहित्यकार कवी, लेखक, कथाकार, रचनाकार याचा सहभाग लाभला. यामध्ये गोंडी साहित्य, गोंडी संस्कृती व अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. या पाच दिवसीय कचारगड यात्रेत भारत उपखंडातील गोंडी लोकांची व जनजातीय लोकांची संस्कृती, परंपरा, बोली, भाषा, रितीरिवाज,पूजा विधी, नृत्यकला व सृष्टीतील महाकाय व रहस्यमयी गुफांचे दर्शन घडून आले.या सर्व आयोजनादरम्यान जवळपास सहा लाख आदिवासी भाविकांनी कचारगडला भेट दिली.

Web Title: Lakhs of devotees visited Kakarhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.