शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोच्या कामांवर सोयीसुविधांचा अभाव

By admin | Updated: May 10, 2014 02:26 IST

शासनाने प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम मिळावे. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार सुरू केली आहे.

गोरेगाव : शासनाने प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम मिळावे. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार सुरू केली आहे. या कामावरील मजुरांना काही मुलभूत सोयी सुविधा देण्याची तरतूद आहे. मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.
मग्रारोहयोच्या कामावरील मजुरांना प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि सावलीत विसावा घेण्याकरिता तात्पुरती झोपडीची व्यवस्था अशा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे या कामांवरील मजुरांना उन्हाचे चटके सहन करित काम करावे लागत आहे. त्यामुळे मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून रोजगार हमी योजनेत आमूलाग्र बदल करण्यात आला. यानंतर मनरेगा ही योजना २00७ पासून अंमलात आली. या योजनेत मजुरांच्या हितांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. मागेल त्याला काम तसेच मूलभूत सोयीसुविधा पुरवून योजना पारदश्री ठेवण्याची तरतूद आहे. परंतु योजनेचे निकष बाजूला करुन अधिकार्‍यांनी मजुरांच्या अधिकारांवर गंडांतर आणल्याचे चित्र दिसून येत आहे. कित्येक ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत.
मग्रारोहयोच्या कामांवरील मजुरांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास प्राथमिक उपचार म्हणून औषधांची व्यवस्था करण्यात येते. मात्र कामावर प्राथमिक औषधोपचाराची व्यवस्था नसल्याचे े चित्र सर्वत्र दिसून येत आहे. मजुरांना पिण्याकरिता आपल्या घरून पाणी घेऊन यावे लागते.यावरून प्रशासन मजुरांच्या हिताप्रती किती सजग आहे, याची प्रचिती येत आहे. या योजनेत एकंदरीत मजुर भरडून निघत आहेत. पंचायत विभाग आणि जिल्हा रोजगार हमी योजना यंत्रणेनेने याकडे त्वरित लक्ष घालून मजुरांच्या हिताकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मजुरांकडून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)