शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशाळा कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत

By admin | Updated: November 10, 2014 22:45 IST

राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच सैनिकी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध सादर करताना प्रयोगशाळा

आमगाव : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच सैनिकी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध सादर करताना प्रयोगशाळा परिचर हे पद रद्द केले आहे. त्यामुळे अतिरिक्त ठरविलेले राज्यभरातील प्रयोगशाळा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.नवीन आकृतीबंधाला मुंबई उच्च न्यायालयात प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेने आव्हान दिले. न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना राज्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयात संच मान्यता देताना हे पद अतिरिक्त दाखविले. त्यामुळे राज्यातील ४० हजार प्रयोगशाळा कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत असून या संदर्भात दिशा ठरविण्यासाठी १६ नोव्हेंबरला गोरेगाव येथे संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य शासनाने २३ आॅक्टोबर रोजी सुधारित आकृतीबंद अध्यादेश काढून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. नव्या आकृतीबंधात २०० पर्यंत विद्यार्थीसंख्येच्या शाळांसाठी एक चतुर्थ कर्मचारी राहतील. या अध्यादेशात चतुर्थ कर्मचाऱ्यांची नोकरीची हमी सेवानिवृत्त होईपर्यंत घेतली आहे. राज्यात या सुधारीत आकृतीबंधाचे काम युध्दस्तरावर सुरू असले तरी विविध शिक्षक संघटना तसेच राज्य प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेने मुंबई उच्च न्यायालायत दाद मागितली आहे. आंदोलनाची पुढीच दिशा कशी राहील हे ठरविण्यासाठी गोरेगाव येथे १६ नोव्हेंबरला आयोजित संघटनेच्या जिल्ह्यातील सर्व प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.