कुडवा नाका-बालाघाट टी पाईंटवर हाेणार उड्डाण पूल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST2021-08-23T04:31:04+5:302021-08-23T04:31:04+5:30

गोंदिया : शहरातील हरिणखेडे पेट्रोल पंप-कुडवा नाका-बालाघाट रोड टी पाईंटपर्यंत उड्डाण पूल तयार करून वाहतुकीची कोंडी सोडविण्याची मागणी माजी ...

Kudwa Naka-Balaghat Tea Point Hainar Flight Bridge () | कुडवा नाका-बालाघाट टी पाईंटवर हाेणार उड्डाण पूल ()

कुडवा नाका-बालाघाट टी पाईंटवर हाेणार उड्डाण पूल ()

गोंदिया : शहरातील हरिणखेडे पेट्रोल पंप-कुडवा नाका-बालाघाट रोड टी पाईंटपर्यंत उड्डाण पूल तयार करून वाहतुकीची कोंडी सोडविण्याची मागणी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेऊन केली. यावर चव्हाण यांनी उड्डाण पूल तयार करण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेतली. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील पिंडकेपार मंदिर, मुंडीपार व सोनपुरी-देवरी रस्ता रुंदीकरणासाठी निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. गोंदिया शहरात येण्यासाठी तिरोडा-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गालगत अनेक शाळा व महाविद्यालये आहेत. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वर्दळ असते. यामुळे बरेचदा हवातुकीची कोंडी होते. या मार्गावरील अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली आहे. यावर त्वरित तोडगा न काढल्यास भविष्यात अधिक समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तिरोडा-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर हरिणखेडे पेट्रोल पंप-कुडवा नाका-बालाघाट टी पाईंटपर्यंत उड्डाण पूल तयार करण्याची गरज असल्याची बाब ना. चव्हाण यांच्या लक्षात आणून दिली. यावर त्यांनी सुध्दा उड्डाण पूल तयार करण्याला मंजुरी दिली. तसेच यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश या विभागाचे प्रधान सचिव सैनिक यांना दिले. गोंदिया-तिरोड व गोंदिया-आमगाव मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी सुध्दा माजी आ. अग्रवाल यांनी ना. चव्हाण यांच्याकडे केली. ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Kudwa Naka-Balaghat Tea Point Hainar Flight Bridge ()