कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे

By Admin | Updated: November 13, 2016 01:31 IST2016-11-13T01:31:11+5:302016-11-13T01:31:11+5:30

विधी सेवा प्राधिकरण कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा व विधी सहाय्य यांची माहिती सर्व जनतेला व्हावी

Knowledge of the law is important | कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे

कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे

आणेकर यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय विधी सेवा दिन
गोंदिया : विधी सेवा प्राधिकरण कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा व विधी सहाय्य यांची माहिती सर्व जनतेला व्हावी या उद्देशाने ९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कारण प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघाच्या संयुक्तवतीने येथील जिल्हा न्यायालयात बुधवारी (दि.९) आयोजीत राष्ट्रीय विधी सेवा दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव ईशरत शेख, सहायक सरकारी वकील अ‍ॅड. पी.एस.आगाशे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. टी.बी.कटरे,महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना न्या.आणेकर यांनी, कार्यक्र मात उपस्थित एका व्यक्तीने ५ व्यक्तींना अशा कार्यक्र मांची, कायद्यांची व योजनांची माहिती सांगितल्यास या कार्यक्र माचे उद्दिष्ट साध्य होईल अस मत व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सदस्य सचिव शेख यांनी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यामार्फत देण्यात येणाऱ्या विधी सेवा, विविध योजनांचे कायदे या विषयावर, तसेच न्यायालयात योग्य प्रकरण दाखल करण्यासाठी तसेच न्यायालयात दाखल असलेल्या योग्य प्रकरणात मोफत वकील पुरविणे, गावस्तरावर मोफत विधी सहाय्य केंद्र, पोलीस स्टेशनमध्ये बालकांचे मदतीसाठी नियुक्त पॅरा लीगल व्हालंटीयर्स, बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई योजना, कारागृहामध्ये बंदयांना मोफत विधी सहाय्य व सल्ला, कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन, लोकअदालतींचे आयोजन, मध्यस्थी योजनांची अंमलबजावणी याबाबत माहिती दिली.
महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सोसे यांनी, त्यांच्या विभागामार्फत दारिद्रय निर्मुलन व महिला सक्षमीकरणाकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. सहायक सरकारी वकील अ‍ॅड. आगाशे यांनी, मानवी तस्करी व लैंगीक शोषणाला बळी पडलेल्यांना विधी सहाय योजना, असंघटीत काम करणाऱ्या कामगारांसाठी कायदा सेवा, बालकांसाठी बालक-स्नेहा विधी सेवा आणि बालकांचे संरक्षण योजना, मनोरुग्ण आणि मानिसक अपंग व्यक्तींकरीता योजना, गरिबी निर्मुलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी योजना, आदिवासी हक्क संरक्षण व कार्यवाही योजना व अंमली पदार्थांमुळे पिडीत व्यक्तींना विधी सेवा आणि अंमली पदार्थांचे निर्मुलन योजना याविषयी माहिती दिली.
जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. कटरे यांनी, महिलांचे संरक्षण विषयक कायद्यांची उपस्थित महिला वर्ग व पक्षकारांना माहिती देवून ज्या महिला, व्यक्तींवर, गटावर अत्याचार होत आहेत त्यांनी न्याय मिळविण्यासाठी व मोफत सहाय्य मिळण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात किंवा तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा असे यावेळी आवाहन केले. संचालन जिल्हा विधी सेवा समितीच्या सदस्य अ‍ॅड. शबाना अंसारी यांनी केले. आभार जिल्हा वकील संघाच्या उपाध्यक्ष अ‍ॅड.सुनिता पिंचा यांनी मानले. कार्यक्र मासाठी महेंद्र पटले, शिवदास थोरात, कपिल पिल्लेवान, आर्यचंद्र गणवीर तसेच पॅरा लीगल व्हॉलंटीयर्स गुरुदयाल जैतवार, संतोष भांडारकर, जमरे, पंधरे, कटरे तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला सर्व न्यायीक अधिकारी, विधी सेवा समिती सदस्य, वकील संघाचे सदस्य व अन्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी )

योजनांच्या माहिती पुस्तिक ा व पत्रकांचे वितरण
विधी सेवांची जास्तीत जास्त जनतेपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी विविध कायदयांची, योजनांची माहिती असणाऱ्या भित्तीपत्रकांची प्रदर्शनी लावण्यात आली होती. या प्रदर्शनीमार्फत जनतेने विविध कायदयांची व योजनांची माहिती घेतली. या प्रदर्शनीमध्ये सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने सहकार्य केले. कार्यक्र मादरम्यान उपस्थितांना विविध कायदे व योजनांची माहिती असलेल्या माहितीपुस्तिका व माहितीपत्रक वितरीत करण्यात आले.

Web Title: Knowledge of the law is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.