विळ्याने मारून मावस्याला केले ठार
By Admin | Updated: November 8, 2014 22:40 IST2014-11-08T22:40:07+5:302014-11-08T22:40:07+5:30
शहरालगतच्या चांदनीटोला (नागरा) येथील घनश्याम नत्थुराम मस्करे (४८) यांच्या गळ्यावर विळ्याने वार करून शेजारीच राहणाऱ्या युवकाने त्यांना ठार केले. मृत इसम मारेकऱ्याचा मावसा आहे.

विळ्याने मारून मावस्याला केले ठार
गोंदिया : शहरालगतच्या चांदनीटोला (नागरा) येथील घनश्याम नत्थुराम मस्करे (४८) यांच्या गळ्यावर विळ्याने वार करून शेजारीच राहणाऱ्या युवकाने त्यांना ठार केले. मृत इसम मारेकऱ्याचा मावसा आहे. या प्रकरणात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून हे कृत्य करणाऱ्या इसमाला निगराणीत ठेवले आहे.
चांदनीटोला (नागरा) येथील लक्ष्मण गुलाब लिल्हारे (३२) याने विळ्याने घराशेजारच्या घनश्याम नत्थूराम मस्करे याच्या गळ्यावर वार केले. ही घटना शुक्रवारच्या दुपारी १२ वाजतादरम्यानची आहे. घटनेनंतर घनश्यामला डॉ.एन.एम. बजाज यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घनश्यामचा ८ नोव्हेंबरच्या पहाटे २.३० वाजता मृत्यू झाला. ग्रामीण ठाण्यातील पोलीस हवालदार संदीप झिले यांनी सदर घटनेची तक्रार नोंदविली.
आरोपी लक्ष्मण लिल्हारे मृतकाच्या घराशेजारी राहतो. ते एकमेकांचे नातेवाईक असल्याचे बोलले जाते. घनश्याम लक्ष्मणचा मावसा लागतो. मागील काही वर्षापासून लक्ष्मण मनोरुग्ण आहे. तो काहीही बडबडत असतो. तो मंदिरात झोपतो व जेवन घनश्यामच्या घरी करीत होता.
या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांच्याशी चर्चा केल्यावर ते म्हणाले, लक्ष्मनला आरोपी बनवू शकत नाही. नागरिकांच्या बयानानंतर त्याला मनोरुग्ण असल्याचे दाखविण्यात आले. त्याला आठ दिवस वेड्यांच्या रूग्णालयात ठेवण्याचा सल्ला मनोरूग्न तज्ज्ञांनी दिला आहे. लक्ष्मण याची विचारपूस करण्यात आली, परंतु वेळोवेळी तो आपले बयान बदलत असतो. कधी तो मृतकाला देशद्रोही म्हणतो तर कधी आपले बयान बदलवितो. त्यामुळे त्याच्यावर विश्वास करता येत नाही असे सांगण्यात आले. डॉक्टरांनी त्याला ‘अनफिट’ घोषित केले तर त्याला वेड्यांच्या दवाखान्यात पाठविले जाऊ शकते.