बिबट्याने केल्या दोन शेळ्या ठार
By Admin | Updated: October 26, 2014 22:42 IST2014-10-26T22:42:50+5:302014-10-26T22:42:50+5:30
येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या कोकणा/जमिंदारी या गावात बिबट्याने चांगलाच धुमाकुळ घातला असून गावातील दोन शेळ््या ठार करुन एका शेळीला गंभीर

बिबट्याने केल्या दोन शेळ्या ठार
सडक/अर्जुनी : येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या कोकणा/जमिंदारी या गावात बिबट्याने चांगलाच धुमाकुळ घातला असून गावातील दोन शेळ््या ठार करुन एका शेळीला गंभीर जखमी केले. २५ आॅक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान लागूनच असल्यामुळे कोकणा/जमि., मनेरी, चिखली, खोबा, बानटोला, बकी आदी गावांत वन्यप्राण्यांचा फारच त्रास वाढला आहे. गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याचा येथे धुमाकूळ सुरू असून त्याने कोकणा/जमी. येथील आनंदराव डोये यांच्या दोन शेळ्या ठार केल्या असून एक शेळी गंभीर जखमी केली. यात डोये यांचे २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे .
माहिती मिळताच वन रक्षक प्रमोद शेंडे, डॉ. चंदू गहाणे, खेमराज भेंडारकर, नरेंद्र डोये, दादू भेंडारकर, परसराम जनबंधू यांनी पंचनामा केला. विभागाने राष्ट्रीय उद्यान लगत सौर ऊर्जेच्या तारांचे सुरक्षा कुंपन तयार करण्याची व नुुकसानभरपाई देण्याची मागणी कोकणावासीयांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)