जन्मदात्याने केली मुलाची हत्या
By Admin | Updated: August 28, 2016 01:04 IST2016-08-28T01:04:08+5:302016-08-28T01:04:08+5:30
घरगुती वाद विकोपाला गेल्याने व्यसनाधीन पित्याने चक्क मुलाची हत्या केली. या वादात पत्नीलाही मारहाण केली. दुखापत झाली आहे.

जन्मदात्याने केली मुलाची हत्या
पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न : मोहाडी (खापा) येथील घटना
चुल्हाड/तुसमर : घरगुती वाद विकोपाला गेल्याने व्यसनाधीन पित्याने चक्क मुलाची हत्या केली. या वादात पत्नीलाही मारहाण केली. दुखापत झाली आहे. आरोपी पित्याला अटक करण्यात आली असून हरेंद्र जयेंद्र शरणागत (२१) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना तालुक्यातील मोहाडी (खापा) येथे २५ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
सिहोरा येथुन ३ किमी अंतरावर असलेल्या मोहाडी (खापा) गावात जयेंद्र शरणागत याच्या कुटूंबात पत्नी आणी मुले आहे. जयेंद्र शरणागत याला दारुचे व्यसन आहे. २५ आॅगस्ट सायंकाळी जयेंद्रने पत्नी आणि मुलाला दारुकरिता पैसे मागितले. पंरतु त्यांनी जयेंद्रला पैसे दिले नाही. यामुळे जयेंद्रने वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातुन जयेंद्रने आधी पत्नी शामकला शरणागत हिला जबर मारहाण केली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वाद सुरु असतानाच जयेंद्रने मुलाच्या डोक्यावर लोखंडी सबळीने मारहाण केली. जखमी हरेंद्र व त्याची आई शामकला हिला उपचारासाठी गावकऱ्यांनी खाजगी दवाखान्यात नेले. नागपुरला नेत असतांना त्याची प्राणज्योत मालविली. इकडे घरात असलेल्या जयेंद्र शरणागत याने दुसऱ्याच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी त्याला वाचविले.
हरेंद्र हा कला विद्यालय सिहोरा येथे द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. जयेंद्र शरणागत याला दारुचे वेसन जडले होते. यामुळे पैशाचे मागणी वरुन त्याचे रोजचे घरात भांडण सुरु होते. यामुळे त्याचा एक मुलगा शैलेंद्र हा गुजरात राज्यात रोजगार निमित्त निघून गेला. घरात पत्नी, हरेंद्र आणि एक १७ वर्षीय मुलगी आहे. फिर्यादी दुर्गा शरणागत यांचे तक्रारीवरुन जयेंद्र शरणागतविरूद्ध भादंवीच्या ३०२, ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला त्याच्या घरातुन सिहोरा पोलिसांनी अटक केली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम माळी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक नागेश झायले करित आहेत.
मोहाडीत गुन्हेगारी वाढतेय
चुल्हाड-चांदपूर मार्गावरील पंचायत समिती क्षेत्र असलेल्या मोहाडी (खापा) गावात घरगुती वादातुन गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. या आधी भावाने बहिनीची हत्या केली असून सावत्र भावाने कुटूंबातील संपत्तीच्या वादातून सख्खा भावाचा ५ जणांचा कुटूंब व वडीलाला यमसदणी पाठविल्याची घटना याच गावातील आहे. या शिवाय प्रियकराच्या मदतीने पतीला ठार करण्यात आले होते. मोहाडीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)