खरीप पीक कर्ज वाटप शेतकरी मेळावा

By Admin | Updated: June 16, 2016 02:23 IST2016-06-16T02:23:10+5:302016-06-16T02:23:10+5:30

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या खरीप पीक कर्ज वाटप कार्यक्रमाचा दुसरा टप्पा तालुक्यात बारा गावात शिबिर घेऊन यशस्वी करण्यात येत आहे.

Kharif crop loan allocation for farmers | खरीप पीक कर्ज वाटप शेतकरी मेळावा

खरीप पीक कर्ज वाटप शेतकरी मेळावा

आमगाव : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या खरीप पीक कर्ज वाटप कार्यक्रमाचा दुसरा टप्पा तालुक्यात बारा गावात शिबिर घेऊन यशस्वी करण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा फायदा घेण्याकरिता शेतकरी मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार राठोड यांनी केले आहे.
तहसील कार्यालय आमगावच्या वतीने खरीप पीक कर्ज वाटपाचा दुसरा टप्पा व शेतकरी मेळावा १४ ते ३० जूनपर्यंत तालुक्यातील बारा गावात आयोजित करण्यात आला आहे. त्यात किकरीपार अंतर्गत कट्टीपार, नवेगाव, डोंगरगाव, धामणगाव येथे १४ जून, भोसा अंतर्गत बोदा, कालीमाटी, मुंडीपार, टाकरी, टेकरी, बंजारीटोला, मानेकसा, रामजीटोला येथे १५ जून, नंगपूरा अंतर्गत सरकारटोला, गोसाईटोला, ननसरी, मरारटोला येथे १७ जून, सितेपार अंतर्गत मोहगाव, करंजी, कातुर्ली, सुपलीपार येथे २० जून, गिरोला अंतर्गत घाटटेमनी, बनियाटोला येथे २० जून, जवरी अंतर्गत शिवणी, चिरचाळबांध, खुर्शीपार, बासीपार, बुराडीटोला, शिवनटोला, भजियापार, खुर्शीपारटोला येथे २२ जून, बोथली अंतर्गत ठाणा, गोरठा, धावडीटोला, मक्कीटोला, ठाणाटोला येथे २३ जून, सुरकुडा अंतर्गत मानेगाव, दहेगाव, धोबीटोला येथे २४ जून, माल्ही अंतर्गत आमगाव, बनगाव, महारीटोला, चिचटोला, कुंभारटोली, शंभुटोला, सावंगी, पदमपूर, बाम्हणी, पिपरटोला, रिसामा, किंडगीपार येथे २७ जून, पानगाव अंतर्गत बोरकन्हार, अंजोरा, कवडी, वळद, रामाटोला, भालीटोला, कटंगटोला, येरमडा, बघेडा येथे २८ जून, सोनेखारी अंतर्गत पिपरटोला, तिगाव, जांभुरटोला, कोपीटोला, कोसमटोला, चिमनटोला, वाघडोंगरी येथे २९ जून, आसोली अंतर्गत फुक्कीमेटा, जामखारी, बिर्सी, नांगटोला, पाटीलटोला, पाऊलदौना येथे २० जून.
अशाप्रकारे १४ ते ३० जूनपर्यंत १२ गट मुख्यालयातून शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात तालुक्यातील ८४ गावातील शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संबंधित गावातील शेतकरी खातेदार यांनी सोबत फोटो, बँक पासबूक, ओखळपत्रात आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक कार्ड सोबत आणणे गरजेचे आहे. तरी सदर गावातील शेतकऱ्यांना मेळाव्यास ग्रामपंचायत भवनात सकाळी १० वाजता उपस्थित राहणे गरजेचे आहे.
सदर गावातील नागरिकांसाठी सदर मेळावा सकाळी १० ते ५ पर्यंत आयोजित केला असल्याचे तहसीलदार राठोड यांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kharif crop loan allocation for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.