विमा ग्राम पुरस्काराने केशोरी ग्रामपंचायत सन्मानित

By Admin | Updated: October 17, 2015 02:32 IST2015-10-17T02:32:01+5:302015-10-17T02:32:01+5:30

भारतीय जीवन विमा निगम शाखा साकोलीकडून सन २०१४-१५ या वर्षात बिमा ग्राम योजनेंतर्गत केशोरी...

Kesori Gram Panchayat honored by the Insurance Village Award | विमा ग्राम पुरस्काराने केशोरी ग्रामपंचायत सन्मानित

विमा ग्राम पुरस्काराने केशोरी ग्रामपंचायत सन्मानित

केशोरी : भारतीय जीवन विमा निगम शाखा साकोलीकडून सन २०१४-१५ या वर्षात बिमा ग्राम योजनेंतर्गत केशोरी ग्रामपंचायत पात्र ठरल्यामुळे पारितोषिक धनादेश वितरण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या तेजूकला गहाणे, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अश्विनी मालाधरे, उपसरपंच हिरालाल पाटील शेंडे, शाखा व्यवस्थापक जांगळेकर, विकास अधिकारी धनंजय हेडाऊ, ग्रा.पं. सदस्य नंदू पाटील गहाणे, श्रीकांत घाटबांधे, वसंत नंदरधने, मनोहर ठाकरे महाराज, श्रीमती ममता समरीत, स्रेहा झोडे, विमा प्रतिनिधी, मुरलीधर ठलाल, संतोष बुकावन, धनंजय तिडके, गौतम तिरपुडे उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी विमा ग्राम योजनेंतर्गत केशोरी ग्रामपंचायतीला ५० हजार रुपयाचे धनादेश मा.जी.वि.मि.शाखा व्यवस्थापक जोगळेकर, सरपंच अश्विनी भालाधरे आणि उपसरपंच हिरालाल शेंडे यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी भारतीय जीवन विमा निगम कडून गावासाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली. यावेळी गावकऱ्यांना विम्याचे महत्व सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत केशोरी येथील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी केशोरी हे गाव विमा ग्राम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
संचालन भगवान गायकवाड यांनी केले तर आभार ग्राम विकास अधिकारी कुटे यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Kesori Gram Panchayat honored by the Insurance Village Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.