कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात केशोरी ग्रामपंचायत पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST2021-04-07T04:29:54+5:302021-04-07T04:29:54+5:30

गावातील प्रमुख मंडळीसह दुकानदार, व्यापारी यांची तातडीची बैठक घेऊन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सूचना देऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करून ...

Keshori Gram Panchayat continues to break the chain of corona infection | कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात केशोरी ग्रामपंचायत पुढे

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात केशोरी ग्रामपंचायत पुढे

गावातील प्रमुख मंडळीसह दुकानदार, व्यापारी यांची तातडीची बैठक घेऊन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सूचना देऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य मिळविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. केशोरी हे गाव या परिसरातील गावांची बाजारपेठ असल्याने येथे येणाऱ्या - जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. कोरोना संसर्गजन्य रोगापासून बचाव व खबरदारी म्हणून आठवडी बाजारावर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली. स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांनी शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेला शेतमाल विक्रीसाठी मुभा देऊन अत्यावश्यक सेवा वगळून दर शनिवारला सर्व दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. आपले कुटुंब, समाज व गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने जबाबदारी स्वीकारून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यावर गावात लॉकडाऊन करून ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकले आहे. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

Web Title: Keshori Gram Panchayat continues to break the chain of corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.