केशोरी परिसर औद्योगिक विकासापासून वंचित

By Admin | Updated: June 18, 2016 01:12 IST2016-06-18T01:12:59+5:302016-06-18T01:12:59+5:30

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी हा परिसर अत्यंत जंगलव्याप्त डोंगराळ आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो.

Keshori area is deprived of industrial development | केशोरी परिसर औद्योगिक विकासापासून वंचित

केशोरी परिसर औद्योगिक विकासापासून वंचित

केशोरी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी हा परिसर अत्यंत जंगलव्याप्त डोंगराळ आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. मोठ्या शहराच्या परिसराचा औद्योगिक विकास साधण्यात राज्य शासन व केंद्र शासन प्रयत्नशील आहे. परंतु केशोरी परिसर उद्योगाच्या विकासापसून वंचित आहे.
भारतीय घटनेतील तरतुदीनुसार आदिवासी परिसराचा देखील विकास होणे आवश्यक असताना सुध्दा या परिसराकडे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पाहिले जात नाही. हा या भागातील सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय आहे.
हरितक्रांती, श्वेतक्रांती बरोबरच या भागातील औद्योगिक क्रांती होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र या औद्योगिक क्रांतीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. सत्ताधाऱ्यांनी शहरातील औद्योगिक विकास क्रांतीचा मोठा वाटा उचलला आहे. जो भाग नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आहे. ज्या ठिकाणी मौल्यवान खनीज व वनसंपत्ती उपलब्ध आहे. त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग या परिसरात निर्माण होऊ नये ही मोठी शोकांतिका समजावी लागेल.
या भागातील खनीज व वनसंपत्ती नेऊन दुसरीकडे उद्योग निर्माण करून तेथील लोकांच्या हाताला काम द्यायचे आणि जिथे पिकते तेथील लोकांची हात रिकामे ठेवायचे हा न्याय तर्कसंगत नाही. हा या भागातील नागरिकांवर अन्याय आहे. या परिसरातील औद्योगिक अनुशेष वाढत आहे.
त्यामुळे या परिसरातील सुशिक्षीत बेरोजगार परराज्यातील शहराकडे धाव घेतांंना दिसत आहेत. याकडे शासनातील सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन केशोरी परिसराचा औद्योगिक विकास करण्याचा प्रयत्न करावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. परंतु लोकप्रतिनिधी उदासिन आहेत. (वार्ताहर)

Web Title: Keshori area is deprived of industrial development