शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शर्टाच्या डाव्या खिशात मोबाइल फोन ठेवणे ठरू शकते धोकादायक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:23 IST

हृदयरोगतज्ज्ञ : पेसमेकरच्या रुग्णांनी काळजी घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हृदयाच्या असामान्य लयवर (ॲरिथमिया) उपचार करण्यासाठी, हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी पेसमेकरचा वापर केला जातो. पेसमेकर लावलेल्या व्यक्तीने शर्टाच्या डाव्या खिशात मोबाइल फोन ठेवू नये, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञांनी दिला आहे. मोबाइलच्या गरजेचे रूपांतर आता व्यसनात होऊ लागले आहे. सोयीपेक्षा जगणंच हैराण करून सोडणारा मोबाइल हा विविध आजारांसाठी कारणीभूत ठरत आहे. बहुसंख्य लोकांना मोबाइलमुळे मानसिक आजाराकडे घेऊन जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोबाइलचा वापर दरदिवसाला वाढणे, वापर न केल्यास अस्वस्थता वाटणे, मोबाइल वाजल्याचा सतत भास होणे, मोबाइलवर सतत गेम खेळणे, सेल्फी घेण्याचा नाद निर्माण होणे, मोबाइल हातात नसताना बोटांच्या हालचाली होणे, ही मोबाइलच्या आजाराची लक्षणे आहेत. स्मार्टफोनचा अति वापर हा मानसिक आजार आहे. 

हृदयाच्या असामान्य गतीवर पेसमेकरची मदतहृदयाची गती मंदावली आहे किंवा त्याचे ठोके चुकले आहेत, तर ते हृदयाला त्याच्या सामान्य गतीवर परत आणण्यासाठी पेसमेकर मदत करतो. कॉलरबोनच्या अगदी खाली त्वचेखाली तो घातला जातो. त्यामुळे पेसमेकर बसविलेल्या रुग्णांना शर्टाच्या डाव्या बाजूच्या खिशात मोबाइल न ठेवण्याचा सल्ला अनेक हृदयरोगतज्ज्ञ देताना दिसून येतात.

ठोस पुरावा नाहीमोबाइल फोन शर्टाच्या डाव्या खिशात ठेवण्याचा आणि हृदयविकाराचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. सध्या अत्याधुनिक पेसमेकर आले आहे. मोबाइलचा त्याच्यावर फारसा प्रभाव पडत नाही. परंतु तरीही काळजी म्हणून हृदयाजवळ मोबाइल ठेवणे टाळायला हवे, असेही हृदयरोगतज्ज्ञ सांगत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHeart Diseaseहृदयरोगgondiya-acगोंदिया