शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार ठेवा बंद; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:59 IST

Gondia : जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार जिल्ह्यात दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजवावा याकरिता जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून मतदारांचा सहभाग वाढविण्याकरिता प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत.

निवडणुकीची मतदान प्रक्रिया निर्भय, शांततामय वातावरणात व निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सदर प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह मतदान पथक दि. १९ नोव्हेंबर रोजी पोहोचणार असून, त्यांच्याजवळ ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व इतर सर्व संवेदनशील साहित्य राहणार आहे. 

या साहित्यास अपाय होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम १९५१ क्रमांक २२ ची कलम ३७ (१) (३) अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये मतदानाच्या कालावधीत विविध बाबींवर प्रतिबंध लागू करण्यात आले आहे. मात्र मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी आठवडी बाजार आयोजित करण्यात येत असतो. त्यामुळे मतदानाच्या दिवशी नागरिकांच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याअर्थी बाजार व जत्रा अधिनियम १८६२ चे कलम ५ (अ) व (क) अंतर्गत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये त्यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी आयोजित करण्यात येणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gondiya-acगोंदियाMarketबाजार