कायाकल्प योजनेत चोपा केंद्र प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 00:50 IST2017-01-02T00:50:22+5:302017-01-02T00:50:22+5:30
कायाकल्प योजनेतंर्गत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी नानाविध सुविधा उपलब्ध करवून खऱ्या अर्थाने

कायाकल्प योजनेत चोपा केंद्र प्रथम
गोरेगाव : कायाकल्प योजनेतंर्गत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी नानाविध सुविधा उपलब्ध करवून खऱ्या अर्थाने कायाकल्प करणाऱ्या तालुक्यातील गाम चोपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. केंद्राने राज्यस्तरावर निवडीसाठी जय्यत तयारी सुरू केली.
कायाकल्प योजनेतून चोपा प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांकरीता वॉटर फिल्टर, वाचनालय, आय व्ही स्टॅन्ड, इलेक्ट्रीक सुविधा, मच्छरदानी, आरोग्य चांगले व व्यसनमुक्ती संदेश फलक, शारीरिक व परिसर स्वच्छता, पाण्याचे निर्जतुकीकरण करूण पाणी पिण्याचे संदेश देणारे फलक, वाचणीय पुस्तके देऊन जागृती करण, आरोग्य केंद्रात स्वच्छता राखणे, केंद्रातच गांडूळ खत निर्मीती करणे व बागेत खत टाकू न बाग उत्तम ठेवणे ज्यामुळे येणाऱ्या रुग्णांचे मन प्रसन्न राखण्यास मदत होणार असे मोलाचे कार्य करण्यात आले आहेत. रुग्णांसोबतच आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना धर्मशाळा उपलब्ध करून देऊन त्यांच्या जेवणाची व राहण्याची नि:शुल्क सोय करण्यात सुद्धा आली आहे.
या केंद्राने कायाकल्प योजनेत सहभाग घेऊन या कार्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक रुग्ण कल्याण समिती, सरपंच, उपसरपंच, सदस्य व चोपावासीयांच्या सहकार्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे राज्यस्तरावर निवडीसाठी केंद्राने तयारी सुरू केली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.आर.तारडे व डॉ.आर.डी.पाचे यांनी सांगीतले असून गावाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)