कटंगीतील धनकचरा प्रकल्पाची जागा वांद्यात

By Admin | Updated: November 18, 2014 22:57 IST2014-11-18T22:57:31+5:302014-11-18T22:57:31+5:30

जवळील ग्राम कटंगी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी असलेली प्रस्तावित जागा वांद्यात आली आहे. विमान प्राधीकरणने या जागेवर आक्षेप घेतल्याने नगर परिषदेची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे.

Katangi Dhankchara Project | कटंगीतील धनकचरा प्रकल्पाची जागा वांद्यात

कटंगीतील धनकचरा प्रकल्पाची जागा वांद्यात

विमान प्राधीकरणाचा आक्षेप : रापेवाडा येथे जागेची पाहणी
कपिल केकत - गोंदिया
जवळील ग्राम कटंगी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी असलेली प्रस्तावित जागा वांद्यात आली आहे. विमान प्राधीकरणने या जागेवर आक्षेप घेतल्याने नगर परिषदेची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे. परिणामी गोंयिा नगर पालिका आता रापेवाडा गावातील जागेची पाहणी करीत आहेत. यासाठी पालिकेकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदेकडे व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजेचे आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती कार्यरत असते. मात्र या प्रकल्पासाठी लागणारी जागा पालिकेकडे नसल्याने पालिका मागील दोन वर्षांपासून जवळील ग्राम कटंगी येथील एका जागेवर शहरात निघणारा घन कचरा टाकत आहे.
याच जागेवर हा प्रकल्प उभारण्यात यावा यासाठी पालिकेचे प्रयत्नही सुरू होते. मात्र मध्यंतरी घेण्यात आलेल्या घन कचरा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विमान प्राधीकरण बिरसी विमानतळचे प्रबंधक अवधेषकुमार यादव यांनी कटंगीची ही जागा बिरसी विमानतळापासून १० किमी. अंतराच्या आत येत असल्याने त्याला विमान प्राधीकरण नियमानुसार परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट केले. शिवाय अन्य काही कारणांना घेऊनही ही जागा प्रकल्पासाठी उपयुक्त नसल्याचे निर्दशनास आले.
समितीतील या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना प्रकल्पासाठी अन्य जागा शोधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नगर परिषदेने जवळील ग्राम रापेवाडा येथील गट क्रमांक ६४३ मधील एक जागा बघितली आहे. बघण्यात आलेल्या जागेतील १० एकर जागा प्रकल्पाला मिळावी यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असून यासंबंधात कारवाई सुरू आहे.
विशेष म्हणजे प्रकल्पासाठी जागाच मिळत नसल्याने पालिकेचे धन कचरा व्यवस्थापन प्रकल्प अद्याप साकारलेले नाही. कटंगी मधील जागेत कचरा टाकणे सुरू करण्यापूर्वी जवळील ग्राम टेमनी येथे पालिका कचरा टाकत होती. मात्र तेथील नागरिकांनी यास विरोध केल्याने तेथूनही पालिकेला माघार घ्यावी लागली होती. त्याता आता कटंगीची जागा हातून गेल्याने पालिकेची डोकेदुखी आणखीणच वाढली आहे. अशात सध्याच्या स्थितीत पालिकेला श्मशान भुमिच्या मागील जागेत कचरा टाकावा लागत आहे. पालिकेकडून सध्या रापेवाडा येथील जागा मिळावी यासाठी कार्यवाही केली जात आहे.

Web Title: Katangi Dhankchara Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.