काकाची हत्या; पुतण्याला जन्मठेप

By Admin | Updated: February 5, 2016 01:15 IST2016-02-05T01:15:46+5:302016-02-05T01:15:46+5:30

हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या काकाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या पुतळ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी (दि.४) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Kaka murder; Puttanake life imprisonment | काकाची हत्या; पुतण्याला जन्मठेप

काकाची हत्या; पुतण्याला जन्मठेप

गोंदिया : हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या काकाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या पुतळ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी (दि.४) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धर्मराज कांतीलाल गहगये (३९) असे पुतण्याचे नाव असून तो गोंदिया तालुक्यातील हिवरा येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिस्से वाटणीत आलेल्या शेतीवरून धर्मराज व त्याचे काका ताराचंद पंचम गहगये (५५) यांच्यात वाद झाला होत. यातच दि.४ डिसेंबर २०१३ रोजी रात्री ताराचंद आपल्या घराच्या छपरीत झोपलेले असताना धर्मराजने रात्री ११.३० च्या सुमारास कुऱ्हाड घेऊन येऊन ताराचंदवर वार करणे सुरू केले. यात मानेवर आणि डोळ्याखाली जबर जखमा होऊन ताराचंद रक्त्ताच्या थारोळ्यात पडले. वैद्यकीय उपचार मिळण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
यावेळी बाजुलाच झोपलेल्या ताराचंदच्या मुलाने (सुरेश) आरडाओरड केल्यानंतर आरोपी धर्मराजने पळ काढला. गंगाझरी पोलिसांनी त्याला अटक करून आणि सर्व पुरावे गोळा करून प्रकरण न्यायप्रवीष्ठ केले. यात सरकारी वकील अ‍ॅड.कैलास खंडेलवाल यांनी ७ साक्षीदार तपासले. त्यावरून जिल्हा-सत्र न्यायाधिश एम.जी.गिरटकर यांनी धर्मराजला कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा व १००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास पो.अधीक्षक व पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनात पो.उपनिरीक्षक अनिल रायपुरे यांनी केला. पैरवी स.पो. निरीक्षक महेश महाले, सहायक फौजदार राजकुमार कराळे, पो.हवालदार दिनेश पालांदूरकर आदींनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Kaka murder; Puttanake life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.