वरिष्ठाच्या आदेशाला केराची टोपली
By Admin | Updated: December 23, 2015 02:27 IST2015-12-23T02:27:35+5:302015-12-23T02:27:35+5:30
जवरी येथील बहुचर्चित व वादग्रस्त रोजगार सेवक अशोक गायधने यांच्यावर कारवाईचे आदेश तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाला दिले.

वरिष्ठाच्या आदेशाला केराची टोपली
तक्रार : ग्रामसेवकाकडून रोजगार सेवकावरची कारवाई कासवगतीने
आमगाव : जवरी येथील बहुचर्चित व वादग्रस्त रोजगार सेवक अशोक गायधने यांच्यावर कारवाईचे आदेश तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाला दिले. मात्र दहा दिवस लोटून ग्रामसेवकाने कुठलीहीे कारवाई केली नाही. वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित ग्रामसेवकाकडून रोजगार सेवकावरची कारवाई कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे गावात व्यापक रोष व्यक्त होत आहे. प्रथम ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी होत आहे.
ग्रामसेवक आर.के. शहारे यांना गट विकास अधिकारी यांनी बुधवारी ९ डिसेंबरला उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा जि.प. गोंदिया व पं.स.च्या प्राथमिक चौकशीनुसार रोजगार सेवक अशोक गायधने यास काढल्याबाबत रितसर कार्यवाही करावी व तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
मात्र गावात ग्रामसभा घेऊन पुन्हा त्याच वादग्रस्त रोजगार सेवकास त्याच ठिकाणी रुजू करण्याचा डाव ग्रामसेवक व स्वत: गायधने यांचा असल्याने गावात या नियुक्तीवर मोठी घटना घडू शकते. त्यामुळे पुन्हा रोजगार सेवक म्हणून गायधने यांची नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी तक्रारकर्त्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)