ज्योत्स्ना बघेलेंची सेल्फी अव्वल

By Admin | Updated: August 3, 2015 01:32 IST2015-08-03T01:32:36+5:302015-08-03T01:32:36+5:30

लोकमत सखी मंच तिरोडाच्यावतीने नगर परिषद बागेत नुकतेच हरियाली मॅचिंग, माँ-बेटी सेल्फी आणि वन मिनीट गेम शोचे आयोजन करण्यात आले होते.

Jyotsna Baghelenchi's selfie tops | ज्योत्स्ना बघेलेंची सेल्फी अव्वल

ज्योत्स्ना बघेलेंची सेल्फी अव्वल

उत्स्फूर्त प्रतिसाद : हरियाली मॅचिंग, मॉं-बेटी सेल्फी व वन मिनट गेम शो
गोंदिया : लोकमत सखी मंच तिरोडाच्यावतीने नगर परिषद बागेत नुकतेच हरियाली मॅचिंग, माँ-बेटी सेल्फी आणि वन मिनीट गेम शोचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांत मोठ्या संख्येत सखींनी भाग घेऊन पुरस्कार जिंकले.
हरियाली मॅचिंग स्पर्धेत मनीता अग्रवाल यांनी प्रथम, शीला अंबुले यांनी द्वितीय व अनिती जैन यांनी तृतीय पुरस्कार पटकाविला. मॉं-बेटी सेल्फी स्पर्धेत ज्योत्स्ना बघेले यांनी प्रथम, तबस्सुम गगन यांनी द्वितीय व मुक्ता मोहिले यांनी तृतीय पुरस्कार पटकाविली. तसेच वन मिटन गेम शो मध्ये माया तिडके यांनी प्रथम शीला अंबुले यांनी द्वितीय तर डॉली चावडा यांनी तृतीय पुरस्कार पटकाविला.
या स्पर्धांना परीक्षक म्हणून लायनेस क्लब पावर सिटीच्या अध्यक्ष छाया मडावी व अ‍ॅड. माधुरी रहांगडाले उपस्थित होत्या. संचालन संयोजित स्वाती राणे यांनी केले. आभार ममता दुबे यांनी मानले.
याप्रसंगी रेणुका खांबरे, निर्मला सरोते, लता छत्तानी, भावना बघेले, रीमा अग्रवाल, वैष्णवी सोनेवाने, तृष्णा बघेले यांच्यासह मोठ्या संख्येत सखींनी उपस्थित राहून स्पर्धांत भाग घेतला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Jyotsna Baghelenchi's selfie tops