जुलै-आॅगस्टचा पगार रखडला
By Admin | Updated: August 28, 2014 23:54 IST2014-08-28T23:54:32+5:302014-08-28T23:54:32+5:30
शिक्षकांच्या पगारातील अडथळे कमी होण्याचे नाव घेत नसून प्राथमिक शिक्षकांचे पगार आता पुन्हा अडले आहेत. जुलै व आॅगस्ट महिन्याचे पगार न झाल्याने सणासुदीच्या तोंडावर शिक्षक अडचणीत आले

जुलै-आॅगस्टचा पगार रखडला
शिक्षकांत नाराजी : शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा व्यर्थ
गोंदिया : शिक्षकांच्या पगारातील अडथळे कमी होण्याचे नाव घेत नसून प्राथमिक शिक्षकांचे पगार आता पुन्हा अडले आहेत. जुलै व आॅगस्ट महिन्याचे पगार न झाल्याने सणासुदीच्या तोंडावर शिक्षक अडचणीत आले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांशी पगाराच्या विषयावर झालेली चर्चाही व्यर्थ ठरल्याने शिक्षकांत नाराजी पसरली आहे.
यापूर्वी उन्हाळ््यात तिन महिन्यांचे पगार अडल्याने शिक्षकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे आपल्या हक्काच्या पगारासाठी शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना घेराव घालण्याची पाळी आली होती. त्यावेळीही शासनाच्या आॅनलाईन प्रणाली व सुस्त शिक्षण विभागाच्या कारभारामुळे शिक्षकांचे पगार अडून पडले होते. यंदाही तोच प्रकार दिसून येत असून यामुळे मात्र प्राथमिक शिक्षक अडणचीत आले आहेत.
पगाराच्या विषयाला घेऊन प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रतिनिधीमंडळाने १९ आॅगस्ट रोजी शिक्षणाधिकारी पाटील यांच्याशी चर्चा केली. चर्चेत शिक्षणाधिकाऱ्यांनी पगार काढण्याचे निर्देश संबंधीतांना दिले. मात्र त्यानंंतरही पगारा निघाले नसल्याने चर्चा फोल ठरली. विशेष म्हणजे जुलै महिन्याचे पगार अगोदरच भेटायला हवे होते. तर पोळा, गणेशोत्सव सारखे सण आल्याने आॅगस्टचे पगार तातडीने काढणे अपेक्षीत होते. येथे मात्र उलट कारभार सुरू असून शिक्षक पगारापासून वंचित आहेत.
या प्रकारांमुळे प्राथमिक शिक्षकांत नाराजीचे वातावरण पसरले असून पुन्हा याचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता त्वरीत पगार काढण्यात यावे अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, एस.यु.वंजारी, आनंद पुंजे, डी.टी.कावळे, केदार गोटेफोडे, नूतन बांगरे, अयूब खान, नागसेन भालेराव, शंकर नागपुरे, यशोधरा सोनवाने, रेणूका जोशी, यू.पी.पारधी, सुधीर बाजपेई, एम.बी.रतनपूरे, विजय डोये, अनिरूद्ध मेश्राम यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)