पूर्ती पब्लिक स्कूलमध्ये ‘पत्रकार दिन’ साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:57+5:302021-01-09T04:23:57+5:30

कार्यक्रमाची सुरुवात तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र बडोले यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्रासमोर दीपप्रज्वलन व पुष्पहार ...

'Journalist Day' celebrated at Purti Public School | पूर्ती पब्लिक स्कूलमध्ये ‘पत्रकार दिन’ साजरा

पूर्ती पब्लिक स्कूलमध्ये ‘पत्रकार दिन’ साजरा

कार्यक्रमाची सुरुवात तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र बडोले यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्रासमोर दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, राजू फुंडे, सचिव प्रा. सागर काटेखाये, हेमंत शर्मा, चंद्रकुमार बहेकार, संतोष अग्रवाल, राजेश भाष्कर, राहुल साठवने, अजय क्षीरसागर, शालिनी बडोले, भावे, ममता गायधने उपस्थित होते. उपस्थितांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्राला मालार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी चुटे यांनी, पत्रकार व वृत्तपत्र हे समाजाला आकार देण्याचे काम करीत असतात. मराठीतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित करून बाळशास्त्री जांभेकर यांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवल्याचे सांगितले. प्रा. लोथे यांनी संचालन केले. राजेश भाष्कर यांनी आभार मानले.

Web Title: 'Journalist Day' celebrated at Purti Public School