जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन आणि लोकमतद्वारे नि:शुल्क हेल्थी बेबी कॅम्प

By Admin | Updated: July 29, 2016 01:56 IST2016-07-29T01:56:11+5:302016-07-29T01:56:11+5:30

पालकांना आपल्या बालकांच्या संतुलित पालन-पोषणाबाबत जागृत बनविण्याच्या उद्देशाने जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन आणि लोकमत वृत्तपत्रसमूह

Johnson and Johnson and Lokmat's Free Healthy Baby Camp | जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन आणि लोकमतद्वारे नि:शुल्क हेल्थी बेबी कॅम्प

जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन आणि लोकमतद्वारे नि:शुल्क हेल्थी बेबी कॅम्प

आरोग्य बालकांचे : लहान बालकांच्या पालन-पोषणाबाबत जनजागृती
गोंदिया : पालकांना आपल्या बालकांच्या संतुलित पालन-पोषणाबाबत जागृत बनविण्याच्या उद्देशाने जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन आणि लोकमत वृत्तपत्रसमूह यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ३१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भव्य ‘हेल्थी बेबी कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर स्थानिक केमिस्ट भवन, साई मंदिरजवळ, गोविंदपूर, गोंदिया येथे होईल.
आपल्या बालकांचे आरोग्य सुदृढ असावे, असे सर्व माता-पित्यांचे स्वप्न असते. स्वस्थ बालके, निरोगी कुटुंब, जागृत समाज व समृद्ध भारत, अशाप्रकारे एकेक चरणातून विकसित होत असलेली आमची संस्कृती व तिला बनविण्याची मोठी जबाबदारी सांभाळणारे जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन सर्वाधिक मातांचा आवडता ब्राँड आहे.
अशाचप्रकारे आपल्या सामाजिक जबाबदारी सातत्याने सांभाळत लोकमत समुहानेसुद्धा याच दृष्टीने आपले पाऊस वाढवत आपली विशिष्ट संकल्पना ठेवली आहे. मागील शंभर वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून ‘जॉन्सन बेबी’ शिशूंच्या सुश्रुषा विज्ञानात गुंतले आहे. हा ठेवा खूप जुना आहे. याच्यासह पिढोनपिढी प्रत्येक पालकाद्वारे आपल्या शिशूला दिलेल्या विश्वासाचा एक स्पर्शसुद्धा आहे.
हा स्पर्श बालकाचे स्वास्थ, निरंतर आरोग्य व आई-वडिलाच्या अटूट विश्वासाला कायम ठेवते. त्यासाठी जॉन्सनचे उत्पादन आईचे वात्सल्य व विज्ञान यांना सोबत मिळवून तयार केले आहे. या स्पर्शाची संपूर्ण जगात हजारो मातांद्वारे योग्य तपासणी केली जाते. यावर त्या सर्व मातांचा विश्वास कायम आहे. याच विश्वासाने बालकाचे पालन-पोषण केले जाते.
जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन व लोकमत वृत्तपत्र समूहाद्वारे आयोजित सदर कॅम्प निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी ठोस प्रयत्न आहे. अशाप्रकारचे आयोजन सतत करण्यात आले आहेत. मागील वर्षीसुद्धा या प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण गोवा व महाराष्ट्रात घेण्यात आले होते. या कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच समाजात आरोग्यविषयक जागृतता वाढते व येणाऱ्या पिढीला संजिवनी देण्याचा प्रयत्न होतो.
या कॅम्पमध्ये सहभाग होणाऱ्या प्रत्येक बाळाला सहभाग प्रमाणपत्र व जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सनतर्फे आकर्षक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. तसेच संपूर्ण परिवारासाठी एक नाविन्यपूर्ण इन्स्टंट फोटोबूथ उपलब्ध केलेला आहे. ज्यामध्ये प्रत्येक परिवारास स्वत:चे एक अविस्मरणीय फोटो व फ्रेम मिळणार आहे.
जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन व लोकमत वृत्तपत्रसमूह आई-वडिलांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होवून त्यांना एक जागृत आई-वडिलांची भूमिका साकारण्याची संधी देत आहे. या कार्यक्रमा आई-वडिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (९८२३१८२३६७, ९८८१०११८२१) यावर संपर्क साधवा. (प्रतिनिधी)

Web Title: Johnson and Johnson and Lokmat's Free Healthy Baby Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.