झालियाच्या यशवंतची अपंगत्वावर मात

By Admin | Updated: June 9, 2014 23:43 IST2014-06-09T23:43:43+5:302014-06-09T23:43:43+5:30

तालुक्याच्या झालिया येथील रहिवासी यशवंत नत्थू वलथरे या युवकाने आयुष्यभरासाठी वाट्याला आलेल्या अपंगत्वावर मात करीत इतर सामान्य माणसांपेक्षा जास्त कामे करुन सुदृढ युवकांनाही लाज यावी

Jhalia's Yashwant's defeat on disability | झालियाच्या यशवंतची अपंगत्वावर मात

झालियाच्या यशवंतची अपंगत्वावर मात

विजय मानकर - सालेकसा
तालुक्याच्या झालिया येथील रहिवासी यशवंत नत्थू वलथरे या युवकाने आयुष्यभरासाठी वाट्याला आलेल्या अपंगत्वावर मात करीत इतर सामान्य माणसांपेक्षा जास्त कामे करुन सुदृढ युवकांनाही लाज यावी असा आदर्श निर्माण केला आहे. आईच्या दुर्लक्षितपणातून जेमतेम एक वर्षाचे वय असताना चुलीत हात घातल्याने त्याला उजव्या हाताचा पंजा गमवावा लागला. पण हाताचा पंजा नसल्याने रडत न बसता तो आज सर्वसामान्य मजुरांप्रमाणे मेहनतीची कामे करीत आहे.
अतिशय गरीबीच्या परिस्थितीत वाढलेला यशवंत आपल्या पत्नी, मुलासह सुखाचा संसार करीत आहे. अपंग असूनही कोणत्याही कामात तो इतरांवर आ२िँं१्रूँं१त राहिला नाही. हे त्याच्या जीवनाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
लोकमतशी बोलताना त्याने आपली जीवनकहानी सांगितली. त्याची कहाणी ऐकून नवल वाटल्याशिवाय राहात नाही. त्याचबरोबर मनातील संवेदना तीव्र झाल्याशिवाय राहात नाही.
यशवंतराव वलथरे हा ढीवर समाजातील युवक आहे. या समाजातील महिला नेहमी पोहे, मुरमुरे घरी तयार करुन गावागावात विकण्याचे काम करतात. परंपरेनुसार यशवंतची आई कौतुका वलथरेसुद्धा आपला पारंपारिक व्यवसाय करणारी व श्रम करणारी महिला होती. परंतु तिच्या एका नजरचुकीने यशवंतला कायमचे अपंगत्व पत्करावे लागले. यशवंता एका वर्षाचा असताना एक दिवस तिने मुरमुरे फोडण्यासाठी चूल पेटवली व आपल्या कामात गुंतली. यशवंत खेळता-खेळता विस्तवात खेळायला गेला अन् आपला उजवा हात त्याने चुलीत टाकून दिला. यात त्याच्या हाताचा पंजा खूप जास्त भाजला. आईकडे यशवंतला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तिने आगीचा दाह कमी करण्यासाठी घरगुती उपचार केले. परंतु आगीत त्याचे सर्व बोटे जळून गेली व पंजा हाताला चिटकूनच राहिला. शेवटी योग्य उपचाराअभावी यशवंतचा उजवा हात कायमचा अपंग झाला व त्याला अपंगत्वाचा ठपका लागला. मात्र यशवंत जसजसा मोठा होत गेला तसतसा तो इतर मुलांसोबत कामे करण्याची सवय लावू लागला. वयात आल्यावर तो सामान्य माणसाप्रमाणे सर्व कामे करू लागला. त्याची काम करण्याची स्फुर्ती पाहून त्याचा लग्न जुळण्यातही अडचण आली नाही.  यशवंतने आपल्या पत्नीसोबत सुखी संसार सुरू केला.
रोज मोलमजुरी करायचा व आपला उदरनिर्वाह करायचा, असा त्याचा नित्यक्रम झाला. यात त्याच्या पत्नीचेही पुरेपूर सहकार्य लाभले. यशवंतरावच्या आई-वडिलाची शेतजमीन नसल्यामुळे मोलमजुरी हा त्याचा उदरनिर्वाहाचा आधार असून त्याने दुसर्‍याच्या शेतात जावून नागर चालविणे, पर्‍हे काढणे, माती खणणे आदी कामे कुशलतेने करुन दाखविले. याच बरोबर सहकार्‍यांसोबत खेळताना क्रिकेट, कबड्डी, खो-खो व इतर खेळात जिद्दीने भाग घ्यायचा. क्रिकेटची बॅट फिरवित असताना इतर मुले त्याच्याकडे बघतच राहायचे.
विहिरीतून पाणी काढण्यासाठी बादलीचा दोर खेचत असताना लोक त्याच्याकडे आजही नवलाईने पाहात असतात. त्याने सांगितले की, शेतीच्या सर्व कामामध्ये गवत किंवा धानकापणीच्या कामात थोडीफार अडचण निर्माण होत असते. सध्या तो ट्रॅक्टरच्या हमाली कामावर जात असून त्यात तो सर्व कामे इतरांच्या बरोबरीत किंवा त्यापेक्षा जास्त करून दाखवतो. ट्रॅक्टरमध्ये विटा भरणे, खाली करणे, वाळू भरणे, उपसणे, माती खणणे, घमेल्यात भरणे इत्यादी सर्व कामे तो करीत असतो. काम व कमाई करणारे असूनसुद्धा यशवंतराव त्यांच्यावर आ२िँं१्रूँं१त न राहता तेवढय़ाच जोमाने काम करीत अर्थाजन करीत आहे.

Web Title: Jhalia's Yashwant's defeat on disability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.