एसटीसह जीपगाड्याही ्रप्रवाशांनी फुल्ल
By Admin | Updated: October 19, 2014 23:40 IST2014-10-19T23:40:33+5:302014-10-19T23:40:33+5:30
रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये जाणारी मंडळी दिवाळीसाठी गावाकडे परतत असल्याने सध्या रेल्वे, एसटी बसगाड्यांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्याही सेवा देण्यात कमी पडत आहेत.

एसटीसह जीपगाड्याही ्रप्रवाशांनी फुल्ल
गोंदिया : रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये जाणारी मंडळी दिवाळीसाठी गावाकडे परतत असल्याने सध्या रेल्वे, एसटी बसगाड्यांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्याही सेवा देण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होऊन अपघाताचा धोका निर्माण होत आहे.
दिवाळीची चाहूल लागल्याने परप्रांतात कामानिमीत्त जाणारा मजुरांचा लोंढा गावाकडे परतू लागला आहे. शिवाय शाळा व महाविद्यालयांनाही सुट्या लागल्याने विद्यार्थी दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी परत येत आहेत. यामुळे प्रवासी वाहनं आता कमी पडू लागले आहेत.
दिवाळीची गर्दी पाहता गोंदिया आगारातून दररोज होत असलेल्या फेऱ्या वाढविण्याची पाळी आगारावर आल आहे. विशेषत: गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश मजूर नागपूर, पुणे शहरात कामाला जातात. ते दिवाळीनिमित्त गावाला परत येत असल्याने सायंकाळच्या वेळी मोठ्या संख्येत प्रवासी संख्या वाढत आहे. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी रेल्वेमार्गाने गोंदियात येणाऱ्यांची संख्या फुलली आहे.
गोंदिया शहरात विविध कार्यालयांमध्ये असलेले कर्मचारी दिवाळीसाठी स्वगावी जात असल्याने रेल्वे स्थानकावर एकच गर्दी दिसून येत आहे. तर प्रवासी संख्या वाढून रेल्वे गाड्या खचाखच भरून जात आहेत. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर ग्रामीण भागात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरून त्यांना आपल्या गावापर्यंत जाण्यासाठी प्रवासी वाहनांतून जावे लाहेत. याचाच फायदा घेत प्रवासी वाहन चांलकाची दिवाळी जोमात दिसून येत आहे. प्रवाश्यांना ग्रामीण भागात जाण्यासाठी शहरातील खासगी वाहनेही तुडूंब भरून वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे.
शहराच्या बालाघाट रस्त्यावर तिरोडा बसस्थानक व जयस्तंभ चौकातून ग्रामीण भागात धावणारी काळीपिवळी वाहने प्रवासी वाहतुक करताना सर्व नियम धाब्यावर ठेऊन प्रवाश्यांची वाहतूक करीत असल्याचेही बघावयास मिळते.
ज्या काळी-पिवळीना नऊ अधिक एकचे परमीट आहेत त्या वाहनांतून सध्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी डांबून वाहतूक केली जात आहे. दिवाळीच्या सणाला आपआपल्या घराची वाट धरणारे प्रवासी जीव मुठीत घालून काळी-पिवळीतून प्रवास करतानाचे चित्र सध्या दिसत आहे.
२१ आॅक्टोबर रोजी धनत्रयोदशी हा दिवाळीचा हिला दिवस येत आहे. म्हणजेच आता नेमका एकच दिवस उरला असून बाहेरगावची मंडळी आपापल्या घराकडची वाट धरू लागली आहे. दिवाळी हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा व महत्वाचा सण असल्याने वर्ष भर घराकडे न फिरकणारेही दवाळी आपल्या परिवारासह साजरा करण्यासाठी आवर्जून आपल्या घरी पोहचतात. अशांची संख्या मोठी असून याचे मूर्त उदाहरण सध्या रेल्वे, एसटी व प्रवासी वाहनांतील गर्दीमधून बघावयास मिळत आहे.
यामुळे यंदा दिवाळीनंतर एसटीच्या उत्पन्नात बरीच वाढ होणार आहे. भाऊबीजेला गर्दी वाढत असल्याने गोंदिया बस आगाराकडून दिवाळीनंतर बसेस वाढविल्या जातात. त्यानुसार यंदाही काहीना काही व्यवस्था केली जाईल. शिवाय खासगी प्रवासी वाहनांची मोठी संख्या असल्याने प्रवाशांना आल्या गंतव्य स्थानी जाण्यासाठी कोणताच त्रास होत नाही. यामुळेच एसटीसह जीपगाड्यांमध्ये प्रवाशांच गर्दी दिसून येत आहे.