‘जय हो’ कार्यक्रमात जयश्री व स्रेहल ठरल्या अव्वल
By Admin | Updated: August 21, 2015 02:15 IST2015-08-21T02:15:44+5:302015-08-21T02:15:44+5:30
लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक प्रसन्न सभागृहात ‘जय हो’ कार्यक्रम पार पडला.

‘जय हो’ कार्यक्रमात जयश्री व स्रेहल ठरल्या अव्वल
अर्जुनी-मोरगाव : लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक प्रसन्न सभागृहात ‘जय हो’ कार्यक्रम पार पडला. यात झालेल्या वेशभुषा स्पर्धेत जयश्री बाळबुद्धे प्रथम व देशभक्ती गीत स्पर्धेत स्रेहल गजापुरेने प्रथम क्रमांक पटकाविला.
अध्यक्षस्थानी मनुजा पाटील होत्या. अतिथी म्हणून प्रतिभा जवरे उपस्थित होत्या. सरस्वती माता व स्व. ज्योत्स्रा दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यानंतर सखी मंच सदस्य नितू पशिने यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर देशभक्ती गीत गायन व वेशभुषा स्पर्धा घेण्यात आल्या. वेशभुषा स्पर्धेचे परीक्षण अनिता अग्रवाल व रोहिणी कुंभारे यांनी तर गीत स्पर्धेचे परीक्षण पूनम संघी व अनुजा पाटील यांनी केले. सखींनी उत्साहाने वेशभुषा स्पर्धेला प्रतिसाद दिला.
यात सुप्रिया टेकाडे, दिशा दिहारी, जयश्री नागपुरे, तृप्ती मेश्राम, प्रीती खोब्रागडे, स्रेहल गजापुरे, प्रीती गोटेफोडे तर देशभक्ती गीत स्पर्धेत चंदा वंजारी, ललिता औरासे, नित पोटे, मीना आकरे आदींचा समावेश होता.
वेशभुषा स्पर्धेत जयश्री बाळबुद्धे प्रथम तर तृप्ती मेश्रामने द्वितीय क्रमांक मिळविला. देशभक्ती गीत स्पर्धेत स्रेहल गजापुरे प्रथम तर जयश्री बाळबुद्धेने द्वितीय क्रमांक मिळविला.
प्रास्ताविक लोकमत सखी मंच संयोजिका नंदिनी धकाते, संचालन मंजुषा तरोणे यांनी तर आभार ममता मैखा यांनी मानले.
कार्यक्रमासाठी लोकमत सखी मंच सदस्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)