शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनचा पूर्णपणे झाला बट्ट्याबोळ ! ८० टक्के गावांमध्ये नळच नाही; बडोले यांचे सभागृहात सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 18:54 IST

गावकरी शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित : बडोले यांनी सभागृहाचे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात ५१,५६० जलजीवन मिशन योजना मंजूर झाल्या होत्या. २०२५ अखेरपर्यंत फक्त २५,५५० योजना पूर्ण झाल्या आहेत. जवळपास २६ हजार योजना रखडलेल्या आहेत. ३१ हजार कोटी रुपये खर्च झाले असले तरी ९० टक्के योजना पूर्ण झाल्या, असा दावा फक्त कागदावर आहे. तर गोंदिया जिल्ह्यात या योजनेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला असून, ८० टक्के गावांमध्ये नळाला अद्यापही पाणी आलेले नाही. त्यामुळे या योजना पूर्ण होणार केव्हा आणि नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी केव्हा मिळेल? असा सवाल आ. राजकुमार बडोले यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी (दि. १०) उपस्थितकरून सभागृहाचे लक्ष वेधले.

केंद्र पुरस्कृत 'जलजीवन मिशन' योजनेच्या अंमलबजावणीवर ताशेरे ओढले. प्रत्यक्षात गावोगावी लोक विचारतात नळाला पाणी केव्हा येईल? खोदलेले रस्ते केव्हा होतील? चोरीला गेलेल्या नळाच्या तोट्या कधी मिळतील? यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असल्याचे आ. राजकुमार बडोले यांनी सभागृहात सांगत या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले. गोंदिया जिल्ह्यातील ८६७ गावांपैकी केवळ २५ गावांमध्ये योजना पूर्ण झाल्या. उर्वरित ७३८ गावांमध्ये योजना अर्धवट किंवा प्रलंबित आहे. १,०४७ पैकी फक्त ४४५ योजना पूर्ण, त्यातल्या त्यात केवळ ९० योजना कार्यान्वित, ६०२ योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. तर ८० टक्के गावांना अजूनही नळजोडणीचे पाणी मिळाले नसल्याची बाबही सभागृहाच्या लक्षात आणून दिली. कंत्राटदारांचा आरोप आहे आम्हाला पैसे मिळाले नाहीत. संपूर्ण जिल्ह्यात फक्त ३-४ एजन्सींना विद्युत जोडणीचे कंत्राट देण्यात आले असून, त्यांनी अवघे १० टक्के काम केले आहे. उर्वरित सर्व योजना प्रलंबित आहेत. उर्वरित निधी तत्काळ द्या आणि योजना लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी त्यांनी केली.

अर्जुनी मोरगाव मतदारसंघात फक्त २५ योजना पूर्ण

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात १५० योजना मंजूर असून, त्यापैकी फक्त २५ योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित योजना कधी पूर्ण होतील, याचे उत्तर प्रशासनाकडेही नाही. जलस्वराज्य योजनेप्रमाणे जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ होऊ नये, अशी विनंती बडोले यांनी विधानसभेत केली.

वनहक्क पट्टे रखडल्याने घरकुल योजनाही ठप्प

गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या वनप्रधान जिल्ह्यांमध्ये नगरपालिका-नगरपंचायतींतर्गत हजारो घरकुले मंजूर असूनही वनहक्क पट्टे वाटप न झाल्याने बांधकाम सुरू होऊ शकत नाही. वारंवार प्रस्ताव पाठवूनही कार्यवाही होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Gondia's Jal Jeevan Mission Fails: No Taps in 80% Villages

Web Summary : Gondia's Jal Jeevan Mission falters, with 80% of villages lacking tap water. Despite significant expenditure, many schemes remain incomplete, prompting questions about project timelines and access to clean drinking water for residents.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनgondiya-acगोंदियाwater shortageपाणी कपातwater transportजलवाहतूकRajkumar Badoleराजकुमार बडोले