शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:50 IST

राज्याला सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त व जलसंकटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची गती खूप मंदावली आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मधील कामे वेळेवर पूर्ण होताना दिसून येत नाही.

ठळक मुद्देकेवळ २६ गावांत १०० टक्के कामे : आठ गावांमध्ये प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याला सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त व जलसंकटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची गती खूप मंदावली आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मधील कामे वेळेवर पूर्ण होताना दिसून येत नाही. तब्बल २७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान मागासल्याचे चित्र आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये ९४, २०१६-१७ मध्ये ७७ व सन २०१७-१८ मध्ये ६३ गावांची निवड करण्यात आली होती. अभियानाला पहिल्या दोन वर्षांत मोठे यश मिळाले. मात्र यानंतर अभियानाची गती खूप मंदावली आहे.मागील वर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये गोरेगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यातील १०-१०; देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्यातील ७-७ तसेच आमगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील ६-६ गावांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व निवडलेल्या गावांपैकी केवळ २६ गावांमध्येच १०० टक्के काम झाले आहे. १० गावांमध्ये ८० टक्के काम झाले आहे. तर २७ गावे असे आहेत, जेथील काम ५० टक्क्यांपर्यंत झाले आहे. यातील दोन गावांत ३० टक्के, ८ गावांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. तर गोंदिया तालुक्यातील एका गावात अजुनही काम सुरू करण्यात आले नाही.सन २०१७-१८ मध्ये १९९१ कामांना अभियानांतर्गत मंजुरी देण्यात आली होती. यापैकी कृषी विभाग १४३८, जि.प. लघू सिंचन विभाग १८३, पंचायत समिती १३६, जलसंधारण २०, वन विभाग १३४ व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ८० कामांचा समावेश आहे. मंजूर कामांपैकी १७५५ कामांना सुरू करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु १३५९ कामांना सुरूवात करण्यात आली. यात कृषी विभागाचे ९६८, जि.प. लघू सिंचन विभाग १४०, पंचायत समितीच्या ११७ कामांचा समावेश आहे.जलसंधारण विभाग व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे आतापर्यंत काम सुरू करण्याचा आदेशसुद्धा देण्यात आला नाही. दोन्ही विभागाद्वारे एकही काम करण्यात आला नाही. तर वन विभागाचे सर्व १३४ कामे सुरु आहेत.वन विभागाचे ५० कामे पूर्ण झाले आहेत, तर ८४ कामे प्रगतीपथावर आहेत. कृषी विभागाचे ७११, जि.प. लघू सिंचन विभागाचे ४५, पंचायत समितीचे ११३ कामे पूर्ण झाले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये कृषी विभाग २५७, जि.प. लघू सिंचन विभाग ९५ व पंचायत समितीच्या ४ कामांचा समावेश आहे.११.६३ कोटींचा झाला खर्चजलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामांपैकी पूर्ण झालेल्या कामांवर आतापर्यंत ११ कोटी ६३ लाख १५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. यापैकी कृषी विभागाद्वारे सर्वाधिक ५ कोटी ३० लाख १७ हजार रूपये, जि.प. लघू सिंचन विभागाद्वारे ३ कोटी ६५ लाख ६९ हजार रूपये, पंचायत समितीद्वारे २ कोटी ६७ लाख २९ हजार रूपयांचा समावेश आहे. तर प्रस्तावित १९९१ कामांवर ७१ कोटी ८६ लाख ४४ हजार रूपये खर्च होणार आहेत. यात कृषी विभाग ४२ कोटी ३३ लाख २९ हजार रूपये, जि.प. लघू सिंचन विभाग १९ कोटी २५ लाख ४१ हजार रूपये, पंचायत समिती ५ कोटी ०८ लाख ५० हजार रूपये, जलसंधारण १ कोटी २१ लाख २४ हजार रूपये, वन विभाग ३ कोटी ५९ लाख ९१ हजार रूपये व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ३८ लाख ०९ हजार रूपयांचा समावेश आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार