शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 1:10 AM

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) नेतृत्वात शेकडो अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करुन स्वत:ला अटक करुन दिली.

ठळक मुद्देसीईओला दिले निवेदन : वाढीव मानधन १ आॅक्टोबर २०१८ पासून लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) नेतृत्वात शेकडो अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करुन स्वत:ला अटक करुन दिली.जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनिस यांनी शहरातील जयस्तंभ चौकातून बुधवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. मोर्चात सहभागी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांना घेवून विद्यमान सरकारविरुध्द घोषणाबाजी केली. मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयासमोर पोहचल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली. यावेळी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी मोर्चाला संबोधीत केले. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून केंद्र शासनाने १ आॅक्टोबर २०१८ पासून जाहीर केलेल्या मानधनातील वाढ महाराष्ट्रात एरियससह देण्यात यावी, सेवा समाप्त सेविका मदतनिस यांना एकमुस्त रक्कम देण्यात यावी, अमृत आहारचे थकीत बिल देण्यात यावे, प्रवास भत्याची प्रलंबित रक्कम देण्यात यावे, अंगणवाडी सेविका-मदतनिसांचे रिक्त पदे भरण्यात यावी या मागण्यांचा समावेश होता. यानंतर मोर्चात सहभागी सर्व अंगवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर स्वत:ला अटक करून देत जेलभरो आंदोलन केले.आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कल्पना पटले, कोषाध्यक्ष मिरा मेश्राम, सचिव रिता शहारे, हौसलाल रहांगडाले, शंकुतला फटींग, आम्रकला डोंगरे, जीवनकला वैद्य, रामचंद्र पाटील, चरणदास भावे, परेश दुरूगवार, सुनिता मलगाम, विना गौतम, वच्छला भोंगाडे, पुष्पा भगत, बिरजूला तिडके, लालेश्वरी शरणागत, अर्चना मेश्राम, पौर्णिमा चुटे, कांचन शहारे, राजलक्षमी हरिणखेडे, विठा पवार, प्रणिता रंगारी, मंजूळा बोरकर, जोत्सना कागदीमेश्राम, चित्रलेखा डोये, सुनिता रहमतकर यांनी केले.