इटखेडा प्रकरण ‘एलसीबी’कडे

By Admin | Updated: September 30, 2016 01:51 IST2016-09-30T01:51:16+5:302016-09-30T01:51:16+5:30

इटखेडा येथील ओमप्रकाश दशरथ लांजेवार यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुरुवारी (२९) आणखी दोन आरोपींना संशयावरुन अटक करण्यात आली.

In ITKHADA case 'LCB' | इटखेडा प्रकरण ‘एलसीबी’कडे

इटखेडा प्रकरण ‘एलसीबी’कडे

आणखी तीन संशयितांना अटक : ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
अर्जुनी मोरगाव : इटखेडा येथील ओमप्रकाश दशरथ लांजेवार यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुरुवारी (२९) आणखी दोन आरोपींना संशयावरुन अटक करण्यात आली. यामुळे संशयित आरोपींची संख्या सहा झाली आहे. त्यांना ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. दरम्यान नागरिकांचा अर्जुनीच्या तपास यंत्रणेवरील अविश्वास पाहता या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचेकडे देण्यात आला आहे.
ओमप्रकाश हा रविवारी रात्रीपासून गायब होता. सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास त्याचा मृतदेह इडियाडोह धरणाच्या घाटी पळसगाव कालव्यातील पुलाजवळ पाण्यात तरंगताना आढळून आला होता. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन स्थानिक ग्रामीण रुग्णालयात मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठविला. मात्र हा पाण्यात बुडून मृत्यू नसून खून केल्याचा आरोप भाऊ देवराम व गावकऱ्यांनी केला होता.
संशयितांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यासाठी ग्रामस्थांनी बुधवारी (ता.२८) मृतदेहासह पोलीस ठाण्यात धडक दिली. स्थानिक महाराणा प्रताप चौकात टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले होते. संतप्त जमावाची बाजू ऐकून उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी मान्य केली. अखेर बुधवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व मृतदेह फेरउत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला.
बुधवारी सायंकाळी संशयित म्हणून मृतकाची पत्नी रंजना ओमप्रकाश लांजेवार (३२), सासरे (रंजनाचे वडील) रामकृष्ण उर्फ बंडू फत्तूजी तलमले (५५), अडयाळ व शरद गुलाबराव मोहरकर (३३) रा.खमारी कुटी यांना अटक करण्यात आली.
गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयराज रन्नवरे यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली. गुरुवारी (२९) पहाटे निताराम उर्फ मिताराम बाबूराव लांजेवार (२५) या संशयितास इटखेडा येथील त्याच्या निवास्थानावरुन अटक केली. भोजराज रामकृष्ण तलमले (२३) रा.अडयाळ व नरेश रामकृष्ण तलमले (२१) रा.अडयाळ यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित आरोपींना ६ आॅक्टोबरपर्यंत (८ दिवसांची) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: In ITKHADA case 'LCB'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.