महिला, युवकांच्या लेखन कलागुणांना प्रोत्साहन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:34 IST2021-09-17T04:34:59+5:302021-09-17T04:34:59+5:30

गोंदिया : तळागाळातील महिला, युवकांच्या लेखन व कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण स्तरावर जागोजागी जनजागृती व साहित्यवृद्धीपर ...

It will promote the writing skills of women and youth | महिला, युवकांच्या लेखन कलागुणांना प्रोत्साहन देणार

महिला, युवकांच्या लेखन कलागुणांना प्रोत्साहन देणार

गोंदिया : तळागाळातील महिला, युवकांच्या लेखन व कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण स्तरावर जागोजागी जनजागृती व साहित्यवृद्धीपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या जिल्हा अध्यक्षा प्रा. डॉ. दिशा गेडाम यांनी दिली.

संस्थेअंतर्गत सुप्रभात चारोळी, कविता, सुभाषित, रांगोळी, दिन विशेष काव्य, कथाकथन, स्त्री संघर्षाची गाथा, लोककथा, लेख, रचना व यावरील प्रतिक्रिया हे दैनिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच महिलांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त करून देणे, समग्र महिलांना लिहिते करून एकाच व्यासपीठावर संघटित करणे, लिहा आणि लिहिते व्हा हे तत्त्व, मुख्य उद्दिष्ट, जिथे जिथे मराठी भाषा तिथे तिथे मराठी लेखिका संघटित करणे, महिलांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन व ऑफलाइन कार्यक्रम आयोजित करून विश्व व्यासपीठ महिलांना मिळवून देणे, मराठी साहित्य चळवळ विश्वात्मक करणे, साहित्याबरोबरच विविध क्षेत्रांतील महिलांना मुक्त व्यासपीठ प्राप्त करून देणे ही आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेचे उद्दिष्टे आहेत. यात महिला, युवकांनी सहभाग घ्यावा, असे संस्थेच्यावतीने अध्यक्ष प्रा. डॉ. दिशा गेडाम, उषाकिरण आत्राम, उपाध्यक्ष डॉ. सुवर्णा हुबेकर, सचिव प्रा. कविता राजाभोज, कार्याध्यक्ष यशोधरा सोनवणे, कोषाध्यक्ष वंदना कटरे, संचालक-सदस्य प्रा. अनिता कोडापे, पुष्पा लिल्हारे, शालू कृपाले यांनी केले आहे.

Web Title: It will promote the writing skills of women and youth