कुऱ्हाडीने जखमी केलेल्या इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST2021-09-10T04:36:21+5:302021-09-10T04:36:21+5:30
देवरी : वडिलांसोबत वाद सुरू असल्याचे बघून मुलाने कुऱ्हाडीने वार करून जखमी केलेल्या इसमाने गोंदियाला नेताना वाटेतच जीव सोडला. ...

कुऱ्हाडीने जखमी केलेल्या इसमाचा मृत्यू
देवरी : वडिलांसोबत वाद सुरू असल्याचे बघून मुलाने कुऱ्हाडीने वार करून जखमी केलेल्या इसमाने गोंदियाला नेताना वाटेतच जीव सोडला. उसने दिलेले ५० रुपये मागणे त्या इसमाला महागात पडले असून बुधवारी (दि. ८) सायंकाळी ६ वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृताचे नाव बच्चनगिरी दौलतगिरी बुंदी (५७, रा. भागी) असे आहे.
बच्चनगिरी बुंदी यांनी येथील रामेश्वर कांबळे या इसमाला ५० रुपये उसने दिले होते. ते पैसे मागण्यासाठी बच्चनगिरी आले असताना रामेश्वरने त्यांच्याशी वाद घातला. वडिलांसोबत सुरू असलेला वाद पाहून त्यांचा मुलगा कुणाल रामेश्वर कांबळे (१९, रा. पंचशील चौक) याने घरातून कुऱ्हाड आणून बच्चनगिरी यांच्या मानेवर घाव घातल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांचा प्रथमोपचार येथील ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदियाला हलवित असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. बबलुगिरी रमेशगिरी चव्हाण (२८, रा. भागी) यांच्या तक्रारीवरून आरोपी कुणाल रामेश्वर कांबळे (१९) याच्याविरुद्ध देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक आनंद घाडगे करीत आहेत.