मानसिक त्रासापोटी इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST2021-06-17T04:20:28+5:302021-06-17T04:20:28+5:30

गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खातिया येथील रुपचंद बोदलजी हत्तीमारे (४५) यांचा मानसिक छळ केल्यामुळे त्यांनी ९ ऑगस्ट, ...

Isma committed suicide by hanging herself due to mental distress | मानसिक त्रासापोटी इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या

मानसिक त्रासापोटी इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या

गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खातिया येथील रुपचंद बोदलजी हत्तीमारे (४५) यांचा मानसिक छळ केल्यामुळे त्यांनी ९ ऑगस्ट, २०२० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात रावणवाडी पोलिसांनी १५ जून, २०२१ रोजी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. रूपचंद बोदल हत्तीमारे (४५) रा. खातीया यांना आरोपी हे नेहमी शिवीगाळ करून धमकी देत होते. रूपचंदने मानसिक त्रासामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस निरीक्षक उमेश मोहनराव पाटील (५१) यांनी चौकशी करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर रावणवाडी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.

Web Title: Isma committed suicide by hanging herself due to mental distress