विषप्राशन करून इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST2021-09-10T04:36:19+5:302021-09-10T04:36:19+5:30

............... माेहफुलाची २० लिटर दारू जप्त गोंदिया : शहरातील नाना चौक कुंभारे नगरातील आरोपी परमेश्वर चिलबुले मेश्राम (३२) हा ...

Isma commits suicide by poisoning | विषप्राशन करून इसमाची आत्महत्या

विषप्राशन करून इसमाची आत्महत्या

...............

माेहफुलाची २० लिटर दारू जप्त

गोंदिया : शहरातील नाना चौक कुंभारे नगरातील आरोपी परमेश्वर चिलबुले मेश्राम (३२) हा मोहफुलाची २० लिटर दारू घेऊन आंबेडकर वाॅर्ड सिंगलटोली येथे असताना पोलीस शिपाई नंदकिशोर मरस्कोल्हे यांनी त्याला रंगेहात पकडून दारू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत दोन हजार रुपये सांगितली जाते. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

...............

उसनवारीवर दिलेले पैसे मागितल्याने वरवंट्याने मारहाण

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या संजयनगर जोगलेकर वाॅर्डातील अब्दुल कादिर शेख (३०) यांनी उसनवारीवर दिलेले पैसे आरोपी फारुख सलीम पठाण (२५, रा. संजयनगर) याला मागितले असता आरोपीने तुझे कशाचे पैसे आहेत असे बोलून त्यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ करून मसाला वाटण्याच्या वरवंट्याने त्यांच्या डोक्यावर मारून जखमी केले. ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजतादरम्यान घडलेल्या घटनेसंदर्भात शहर पोलिसांनी आरोपी फारूक पठाण विरुद्ध भादंविच्या कलम ३२४,५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

............

Web Title: Isma commits suicide by poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.