सिंचनातून समृद्धी आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:39 IST2019-08-04T21:39:41+5:302019-08-04T21:39:58+5:30
शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावी आणि सिंचनाची समस्या भेडसावू नये यासाठी मागील पाच वर्षांत राज्य सरकारने अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लावले. सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृध्द आणि सक्षम करण्याचा आमचा ध्यास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सिंचनातून समृद्धी आणणार
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावी आणि सिंचनाची समस्या भेडसावू नये यासाठी मागील पाच वर्षांत राज्य सरकारने अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लावले. सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृध्द आणि सक्षम करण्याचा आमचा ध्यास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे तिरोडा येथील सुकडी नाका टी-पार्इंटवर शनिवारी भाजपतफे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने आ.विजय रहांगडाले, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, खा.सुनील मेंढे, आ. राजकुमार बडोले,गुड्डू बोपचे, स्वानंद पारधी, माजी आ.हरिष मोरे, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उमा हारोडे, देवेंद्र तिवारी, सुनील कुंभारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय ढिंकवार, सदस्य पिंटू रहांगडाले, राजेश गुणेरिया, व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीत जशी साथ जनतेनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली तशीच साथ आणि आशिवार्द घेण्यासाठी ही महाजनादेश यात्रा असल्याचे सांगितले.या वेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. आ. विजय रहांगडाले यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. या वेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री परिणय फुके यांनीही मार्गदर्शन केले. तिरोडा काँग्रेस शहरध्यक्ष लक्ष्मीनारायण दुबे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लक्ष्मीनारायण दुबे यांचा पक्षाचा दुप्पटा घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.