एमआरईजीएसच्या कामातून जलसिंचनात होणार वाढ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:55 IST2021-03-04T04:55:54+5:302021-03-04T04:55:54+5:30
बोंडगावदेवी : गावातील जनतेला काम मिळून हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने एमआरईजीएसची कामे उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक ...

एमआरईजीएसच्या कामातून जलसिंचनात होणार वाढ ()
बोंडगावदेवी : गावातील जनतेला काम मिळून हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने एमआरईजीएसची कामे उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. या कामांच्या माध्यमातून पाण्याच्या संचित साठ्यात वाढ होईल. लगतच्या शेतकऱ्यांना संग्रहित पाण्याचा मुबलक वापर करणे सहज शक्य होणार, नाला सरळीकरण बांधकामामुळे पाणी वाहते राहून जलसिंचनामध्ये वाढ झाल्यास उत्पादनात अपेक्षित वाढ होणार, असे मत सरपंच प्रतिमा बोरकर यांनी व्यक्त केले.
सानगडी रस्ता ते मुरारी बोरकर यांच्या शेतशिवारापर्यंत नाला सरळीकरण बांधकामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत नाला सरळीकरण बांधकामाच्या शुभारंभप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ॲड. श्रीकांत बनपूरकर, अमरचंद ठवरे, सदस्या उषा पुस्तोडे, निराशा मेश्राम, माधुरी गोंधळे, ग्रामविकास अधिकारी पी.एम. समरीत उपस्थित होते. सरपंच प्रतिमा बोरकर यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करून तसेच कुदळ मारून बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. बांधकामावर पाच लाखांचा खर्च अपेक्षित आहे. गावातील ५४० महिला पुरुषांना कामाची संधी मिळाली. ग्रामस्थांना गावामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी आळीपाळीने प्रत्येक नागरिकांना कामाची संधी मिळणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास अधिकारी पी.एम. समरीत यांनी केले. उपस्थितांचे आभार रोजगार सेवक सचिन नाकाडे यांनी मानले.