सिंचन क्षेत्रात ११ हजार हेक्टरने वाढ

By Admin | Updated: February 1, 2016 01:45 IST2016-02-01T01:45:23+5:302016-02-01T01:45:23+5:30

अनेक ठिकाणची शेती वरथेंबी पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी दुबार पीक किंवा रबीचे पीक घेण्यास धजावत नव्हते.

The irrigation area has increased by 11 thousand hectare | सिंचन क्षेत्रात ११ हजार हेक्टरने वाढ

सिंचन क्षेत्रात ११ हजार हेक्टरने वाढ

जलयुक्त शिवार अभियानाचे फलित : विविध कामांवर २६९८.५५ लाख खर्च
देवानंद शहारे गोंदिया
अनेक ठिकाणची शेती वरथेंबी पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी दुबार पीक किंवा रबीचे पीक घेण्यास धजावत नव्हते. मात्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केल्याने अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. तळे व बोडीतील गाळ काढून पाण्याचा साठा वाढविण्यात आला. या प्रकाराने जिल्ह्यात आता ११,०२०.११ हेक्टर सिंचन क्षेत्र वाढले आहे.
जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यातील एकूण ९४ गावांमध्ये राबविण्यात आले. एमआय-झेडपी (मायनर एरिकेशन), एमआय-लोकल सेक्टर, वन विभाग व कृषी विभाग यांच्या अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील २४ गावे, तिरोडा येथील २४, गोरेगाव येथील १३, आमगाव येथील ४, देवरी येथील ७, सालेकसा येथील १३, अर्जुनी-मोरगाव येथील ४ व सडक-अर्जुनी येथील ५ गावांचा समावेश आहे. पूर्वी जिल्ह्यात ३१,५७६ हेक्टर सिंचित क्षेत्र होते. मात्र आता सदर ९४ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आल्याने त्यात ११,०२०.११ हेक्टर सिंचन क्षेत्राची वाढ झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्यावतीने करण्यात आलेल्या कामांवर आतापर्यंत २६९८.५५ लाख रूपयांचा आतापर्यंत खर्च झालेला आहे.
यात एकूण ३९०८.७० हेक्टरमधील १,०६० कामांपैकी २,६३४ हेक्टरमधील ८३१ कामे पूर्ण झालेली आहेत. तर ५४ कामे प्रगतिपथावर असून सध्या १७५ कामे बंद आहेत.

जलयुक्त शिवारची ८३१ कामे पूर्ण
सलग समतल २० हेक्टरमध्ये चार कामे, माती नाला बांधकाम १८, मजगी ५६ हेक्टरमध्ये सात, गेबियन स्ट्रक्चर ३४, शेततळे ६०, साखळी सिमेंट बंधारे ५३, सिमेंट बंधारा दुरूस्ती १, नाळा खोलीकरण-सरळीकरण १५, केटी वेअर १, गाळ काढणे शासकीय ९९, गाळ काढणे सीएसआर ४६, ठिंबक सिंचन १७५.७ हेक्टरमध्ये २३९ कामे, १२.०४ हेक्टरमध्ये ८ कामे, वनतलाव १, भात खाचर दुरूस्ती २,३७० हेक्टरमध्ये १५८ कामे, साठवण बंधारा २४, बोडी खोलीकरण-जुनी बोडी दुरूस्ती ४३, तलाव खोलीकरण-दुरूस्ती १६, मामा तलाव दुरूस्ती ३ व लघु पाटबंधारे तलाव दुरूस्ती १ अशी एकूण ८३१ कामे पूर्ण झालेली आहे.

Web Title: The irrigation area has increased by 11 thousand hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.