विद्युतचा अनियमित पुरवठा; कृषी पंप जळाले
By Admin | Updated: May 7, 2015 00:35 IST2015-05-07T00:35:05+5:302015-05-07T00:35:05+5:30
सिहोरा परिसरात विजेचा अल्प तथा अधिक दाबाचा पुरवठा सुरु झाला आहे.

विद्युतचा अनियमित पुरवठा; कृषी पंप जळाले
धानाचे पीक अडचणीत नळ योजनाही प्रभावित कुलर पंखे बंद
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात विजेचा अल्प तथा अधिक दाबाचा पुरवठा सुरु झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंप जळण्यास सुरुवात झाली असून उन्हाळी धानाचे पीक अडचणीत आले आहे.
वैनगंगा बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात यंदा उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी अभावी चांदपुर जलाशयाचे पाणी वाटप करण्यात आले नाही. यामुळे २ हजार हेक्टर आर शेतीत धानाची लागवड झाली नाही. मात्र कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली आहे.
या शिवाय वैनगंगा नदी पात्रात पाणीच पाणी असल्याने नदी काठालगत शेतकऱ्यांनी कृषी पंपाने पाण्याचा उपसा करण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात थ्री फेज व सिंगल फेज असा विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. २४ तास घरगुती शेतकऱ्यांना थ्री फेज विज पुरवठा ८ तास करण्यात येत आहे. रात्री १२ वाजेच्या सुमारास थ्री फेज विज पुरवठा सुरु होत आहे. या विज पुरवठ्यात अल्प तथा अधिक वाढता दाब असल्याने शेतकऱ्यांचे कृषी पंप जळत आहेत. गेल्या आठवड्यात कृषी पंप जळाल्याचा आकडा ३० च्या घरात गेला आहे. एकच कृषी पंप दोनदा जळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी पंप दुरुस्तीचा भुर्दंड या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे उन्हाळी धानपिक अडचणीत आलेला आहेत.
कृषी पंप दुरुस्ती करिता दुकानात शेतकऱ्यांची गर्दी सुरु झाली आहे. थ्री फेज विज पुरवठा मध्यरात्री सुरु करण्यात येत असल्याने शेतकऱ्यात शेतात ये-जा करण्यास भिति निर्माण होत आहे. जग झोपला असतांना देशांचा पोशिंदा शेतकरी मात्र रात्र जागुन काढत आहे. हा चिंतेचा विषय आहे. या परिसरात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली असून शेत शिवारात रानडुकराचे वास्तव्य शेतकऱ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.
सिहोरा परिसरात अल्प तथा अधिक दाबाचा विजेचा पुरवठा होत असून सिंंगल आणि थ्री फेज विज पुरवठयात शेतकरी अडचणीत आला आहे. एक ना धड भाराभर चिंधा अवस्था झाली असून रोज २ कृषी पंप जळत आहेत.
-रेखा सोनवाने, सरपंच चुल्हाड.
सिंगल आणि थ्री फेज विज पुरवठ्याचा फटका नळ योजनांना बसत आहे. नळ योजनाचे पंप जळत असल्याने गावात पाणी टंचाईचा सामना संभाव्य जनतेला करावा लागत आहे.
-नेहा पटले, अध्यक्ष, महिला मंडळ चुल्हाड.
सिंगल फेज विज पुरवठयामुळे कुलर, पंखे शोभोची वास्तु ठरत आहेत. अनेक गावात विज दाबाची समस्या असून थ्री फेज विज पुरवठ्याची गरज आहे.
-अंजली पारधी, गृहिणी वारपिंडकेपार.