अवैध मुरूम उत्खनन प्रकरण थंडबस्त्यात
By Admin | Updated: September 3, 2016 00:03 IST2016-09-03T00:03:05+5:302016-09-03T00:03:05+5:30
येथील गट क्रमांक ६८ या शासकीय जागेतून २४० ब्राम मुरूमाचे अवैधरित्या उत्खनन झाले.

अवैध मुरूम उत्खनन प्रकरण थंडबस्त्यात
कारवाई नाहीच : गावात विविध चर्चांना ऊत
बाराभाटी : येथील गट क्रमांक ६८ या शासकीय जागेतून २४० ब्राम मुरूमाचे अवैधरित्या उत्खनन झाले. यातील १९० ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र असे असतानाही काहीच कारवाई झाली नसून प्रकरण थंडबस्त्यात गेल्याचे गावकरी बोलत आहेत.
या अवैध मुरूम प्रकरणात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांचा हात असल्याचे तहसील कार्यालयाकडून कळले. ग्रामपंचायतने गावच्या रस्ता सबळीकरणासाठी ५० ब्रास रॉॅयल्टी काढली होती. परंतू ही रॉयल्टी रिकामीच होती व १२ ट्रॅक्टरपैकी एकाही ट्रॅक्टराला देण्यात आली नाही. परंतू दोन ट्रॅक्टर १६ अॅगस्ट रोजी पोलिसांनी पकडल्याचे गावकऱ्यांनी बघितले. ५० ब्रास रॉयल्टी कोरीच आहे.
या शासकीय जागेची मौका तपासणी व मोजमाप केले तेव्हा २४० ब्रास मुरूम खोदले असल्याचे समजले. म्हणजेच १९० ब्रास अवैधरित्या ग्रामपंचायतने खोदे आहे असे समजले. ५० ब्रास मुरूमापैकी गावातील रस्त्यावर, आंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा तर काही नागरिकांच्या घरी असा वापर झाला. तर उर्वरीत मिरून बाहेरगावी विकला गेला असे गावकरी सांगतात. असे अवैध धंदे ग्रामपंचायत करणार तर गावचा विकास कसा होणार असे गावकरी बोलत आहेत.
असे असतानाही संबंधीत विभागाने मालाची जप्ती केली नसून कोणतीही कारवाई केली नसल्याचे गावकरी व पदाधिकारीही सांगत आहेत.
प्रकरणी उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांना विचारणा केली असता त्यांनी, सहा लाख ४६ हजार रूपयांचा दंड होणार असल्याचे सांगीतले. मात्र हा दंड होणार कुणाला, किती जणांना किती दंड व प्रकरणात कुणाचा समावेश आहे याबाबत मागील १५ दिवसांपासून गावात चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकरणात संबंधीत विभागाकडून काय कारवाई केली जाते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)