बकऱ्या चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:54+5:302021-02-05T07:47:54+5:30
गोंदिया : जिल्ह्यातून विविध ठिकठिकाणांतून बकऱ्या चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीच्या पाच ...

बकऱ्या चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक
गोंदिया : जिल्ह्यातून विविध ठिकठिकाणांतून बकऱ्या चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीच्या पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४० बकऱ्या जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
३१ जानेवारी रोजी पाच आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी छत्तीसगडच्या भिला्ई येथील आहेत. आरोपी शाहिल शहादत हुसेन (२१) रा. श्रीराम चौक, उडिया मोहल्ला खुशिपार, भिलाई, मिथुनकुमार श्रीरामचरण सिंग (२६) रा. बापूनगर खुशिपार, भिलाई, सोनू ऊर्फ राकेश ध्यानसिंग सरदार (२१) रा. बापूनगर खुशिपार, भिलाई यांना शिताफीने पकडण्यात आले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी मुख्य आरोपी गोलू ऊर्फ आमिर मुबारक हुसेन (३५) रा. बापुनगर उडिया मोहल्ला खुशिपार, भिलाई, सलमान खुरेशी रा. बापूनगर उडिया मोहल्ला खुशिपार, भिलाई यांची नावे सांगितली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींनी १३ जानेवारी रोजी अर्जुनी - मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या निमगाव, खांबी येथील मनोहर गोविंदा ठाकरे आणि देवेंद्र प्रताप रुखमोडे यांच्या गोठ्यातून ७ जमनापारी जातीच्या शेळ्या व बकरे किंमत १ लाख ६० हजार रुपयांचा माल चोरून नेला. याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या आरोपींना अटक केली. या कारवाईत चोरीला गेलेल्या शेळ्या व बकरे ४० नग अंदाजे किंमत २ लाख, ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन सीजी ०७ बीझेड ५२४२ किंमत ७ लाख रुपयांचा माल असा एकूण ९ लाख ९० हजारांचा माल जप्त करण्यात आला. आरोपींना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, तेजेन्द्र मेश्राम, सहाय्यक फौजदार गोपाल कापगते, लिलेन्द्र बैस, अर्जुन कावळे, पोलीस नायक तुलसीदास लुटे, रेखलाल गौतम, अजय राहांगडाले, इंद्रजित बिसेन, दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे यांनी केली आहे.
बॉक्स
आरोपींनी दिली आठ गुन्ह्यांची कबुली
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खुर्शिपार, भिलाई जिल्हा दुर्ग (छत्तीसगड) परिसरातून अटक केलेल्या पाच आरोपींची कसून विचारपूस केल्यावर त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील आठ गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. यात नवेगांवबांध पोलीस ठाण्यांतर्गत १, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत एक, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत २, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत १, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत १, अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत दोन अशी एकूण ८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.