एकात्म मानवतावादानेच राष्ट्रविकास शक्य
By Admin | Updated: December 15, 2015 03:59 IST2015-12-15T03:59:49+5:302015-12-15T03:59:49+5:30
या देशात सर्व धर्म पंथांचे लोक राहतात. भाषा व वेशभूषा जरी वेगवेगळी असली तरी विविधतेतून एकतेची संकल्पना

एकात्म मानवतावादानेच राष्ट्रविकास शक्य
देवरी : या देशात सर्व धर्म पंथांचे लोक राहतात. भाषा व वेशभूषा जरी वेगवेगळी असली तरी विविधतेतून एकतेची संकल्पना दिसून येते. देश स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेस व सहकाऱ्यांची सत्ता होती. इतिहास बघता सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना व एकात्म मानववाद जर समजून घेतला असता तर राष्ट्राचा विकास झाला असता, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना व्यक्त केले.
देवरी येथील धुकेश्वरी मंदिर सभागृहात गुरूवारी पं. दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी आमगाव विधानसभा क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्त्यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेतील समारोपीय सत्रात ते बोलत होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर मंचावर उपस्थित होते.
एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केशवराव मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रामुख्याने आ. संजय पुराम, सुरेश मालगावे, राकेश शमार, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, जि.प. सदस्य अल्ताफ हमीद, सरिता रहांगडाले, सभापती देवकी मरई, सविता पुराम उपस्थित होते. केशवराव मानकर यांनी संघटना मजबूत करायची असेल तर निवडणूक जिंकायला पाहिजे. लढाई जिंकण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सज्ज रहायला हवे, असे आवाहन केले. तर आ. संजय पुराम यांनी, कार्यकर्त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याची गरज असून त्यामुळे कार्यकर्ता परिपक्व होतो, असे सांगितले.
वक्ता डॉ. प्रकाश मालगावे यांनी संघटन व कार्यपध्दती या विषयावर मार्गदर्शन केले. भाजपा इतिहास व विकास यावर जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी प्रकाश टाकला. राजेश बांते यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना समजावून सांगितल्या. अनिल जोशी यांनी विचार, परिवार आणि संकल्पना या विषयावर माहिती दिली. केशवराव मानकर यांनी संघटन या विषयावर माहिती दिली. तर सोशल मीडिया व व्यवस्थापन मीडियाचे समाजातील महत्त्व जयंत शुक्ला यांनी समजावून सांगितले.
प्रास्ताविक सुभाष आकरे यांनी तर संचालन लक्ष्मण सोनसर्वे यांनी केले. एक दिवशीय प्रशिक्षण शिबिरासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
प्रशिक्षण वर्गात आमगाव विधानसभा क्षेत्रातील आमगाव, सालेकसा, देवरी मंडळातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. (प्रतिनिधी)