नर्सिंग इमारत बांधकामाचे अधिकाऱ्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:56 AM2017-07-25T00:56:04+5:302017-07-25T00:56:04+5:30

येथील एएनएम व जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांनी आरोग्य विभागाचे ....

Instructions to the officers of the nursing building | नर्सिंग इमारत बांधकामाचे अधिकाऱ्यांना निर्देश

नर्सिंग इमारत बांधकामाचे अधिकाऱ्यांना निर्देश

Next

गोपालदास अग्रवाल : एएनएम-जीएनएम कोर्सेससाठी कोटा वाढविण्याचे प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील एएनएम व जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांनी आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास व मंत्रालयीन अधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना इमारतीचे बांधकाम सुरू करण्याचे निर्देश दिले.
आ. अग्रवाल म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक-युवतींना रोजगारोन्मुख शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यात शासकीय एएनएम व जीएनएम नर्सिंग महाविद्यालयांना मंजुरी मिळवून दिली होती. परंतु दरवर्षी संस्थेमध्ये दोन्ही कोर्सेससाठी केवळ २०-२० विद्यार्थिनींनाच प्रवेशाचा कोटा आहे. मात्र प्रवेशासाठी दरवर्षी चार-पाच हजार अर्ज प्राप्त होत आहेत. यावरून जिल्ह्यात वाढणाऱ्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत. अशात एकीकडे योग्य इमारतीच्या अभावाने शिक्षण संस्थेच्या कार्यात अडचण निर्माण होत आहे. तर दुसरीकडे भारतीय नर्सिंग कॉऊंसिलद्वारे २० विद्यार्थिनींचा संख्या वाढवून ५० करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना अपुऱ्या व्यवस्थेमुळे कोटा वाढत नाही. इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध आहे. यानंतरही बांधकामास विलंब होत आहे. सदर बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे, असे निर्देश आ. अग्रवाल यांनी बैठकीत दिले.
याप्रसंगी आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले, इमारत बांधकामासाठी आ. अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळेच गोंदियात जागा उपलब्ध झाली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी देण्यात आला.
बांधकामासाठी अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार केले जात आहे. प्रस्तावाला बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी घेवून मंजुरी देणे अपेक्षित आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या १६ कोटींच्या निधीतून कार्य सुरू करण्यासाठी सदर निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु सा.बां. विभागाद्वारे विलंब केले जात आहे. या विभागाशी संपर्क साधून लवकरच बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन बैठकीत व्यास यांनी दिले.
बैठकीत आरोग्य विभागाचे निर्देशक सतीश पवारसुद्धा उपस्थित होते. आ. अग्रवाल यांच्या पुढाकाराने नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणे व महाविद्यालयात २०-२० जागांच्या प्रवेशाचा कोटा वाढून ५०-५० जागा होण्याची शक्यता वाढली आहे.

Web Title: Instructions to the officers of the nursing building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.